Iftar Party | इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा ; माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

HomeBreaking News

Iftar Party | इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा ; माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

Ganesh Kumar Mule Mar 27, 2025 7:46 PM

Nagar Road BRT | नगररोड येथील बीआरटी मार्ग काढल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात! | डॉ सिद्धार्थ धेंडे यांचा आरोप
Lumbini Park | लुंबिनी उद्यान महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण स्पर्धेत ठरले प्रथम | मिळाली मध्यम टॉफी आणि प्रशस्तीपत्रक
MHADA | Stamp Duty Amenity Scheme | म्हाडाच्या इमारत पुनर्विकासातील अडथळे हटणार | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

Iftar Party | इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा ; माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

– प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजन

 

Dr Siddharth Dhende – (The Karbhari News Service) –  मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त पुणे महापालिकेच्‍या प्रभाग क्रमांक दोन मध्ये रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली. सामाजिक एकोपा व सलोखा जपण्यासाठी गेल्या १८ वर्षांपासून माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्‍या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित केला जात आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्याच्‍या उद्देशाने होणारा हा कार्यक्रम समतेची बीजे रोवतो, असे प्रतिपादन उपस्थिती मान्यवरांनी व्यक्त केल्या. (Ramazan Eid)

माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील डॉ. सिद्धार्थ धेंडे क्लिनिक, स्वराज मित्र मंडळ शनी मंदिर समोर या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी शास्त्रीनगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक मेहेर मॅडम, क्राईम पोलिस निरिक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक सुर्वे, माजी नगरसेवक हनिफ शेख, माजी नगरसेवक अय्युब शेख , माजी नगरसेवक अशोक कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे , भाजपचे प्रवक्ते मंगेश गोळे, नाना नलावडे, नामदेव घाडगे, सरबजीत सिंग सिद्ु, बादशाह सय्यद, डॅनियल मगर , रिझवाना शेख, अक्रमभाई, यासिन भाई, अकबर शेख ईफ्तेकार अंसारी, मुनिर शेख, नासिर शेख, फहिम शेख, फैयाझ शेख, अशोक विटकर , अशिष शिंदे , राकेश चौरे , गुलाब गायकवाड, महापुरे , महेश वाघ , मोहम्मद भाई , अमजद मकदुम आदीसह विविध जाती-धर्मातील समाजबांधव उपस्थित होते.

भारत देश हा संविधानाची मूल्य जपतो. येथे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. प्रभागातील मैत्री भावना व सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी डाॅ. सिद्धार्थ धेंडे सर्व समाजाला सोबत घेउन गेली १८ वर्ष हा उपक्रम करत आहेत. त्यांचे कार्य हे सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहे, असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी यावेळी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमात माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्‍या पुढाकाराने शिरखुर्मा आणि सुका मेवाचे वाटप करण्यात येते. यंदाच्‍या वर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. स्वराज मित्र मंडळ यांनी सर्वांचे स्वागत केले .

——
सर्व जाती-धर्मातील लोकांमध्ये भाईचारा कायम टिकावा, यासाठी आम्‍ही १८ वर्षांपासून हा उपक्रम घेत आहोत. संविधानाने ज्‍या मानवी मुल्‍यांची रुजवणूक केली आहे. त्‍याच्‍या अंमलबजावणीचा प्रयत्‍न प्रभाग दोन मधील सर्वच नागरिकांकडून केला जात आहे. सर्वधर्म समभाव ही भावना प्रभाग क्रमांक दोन मध्ये जपली जात असल्‍याचे दिसते.

डाॅ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.