Surgery : PMC : ही शस्त्रक्रिया केली तर महापालिका देणार 1100 रु.  : सोबत नातेवाईक आणला तर त्यालाही 200 रु. 

HomeपुणेBreaking News

Surgery : PMC : ही शस्त्रक्रिया केली तर महापालिका देणार 1100 रु.  : सोबत नातेवाईक आणला तर त्यालाही 200 रु. 

Ganesh Kumar Mule May 08, 2022 12:27 PM

Prevent accidents : रहदारीच्या चौकातील अपघात रोखणार महापालिका  : पायलट प्रोजेक्ट वर काम सुरु 
PMPML Passes | पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता पीएमपीएमएल कडून  अनुदानित पासेसचे वितरण सुरु 
Municipal Secretary’s Department : नगरसचिव विभागाकडील 36 कर्मचाऱ्यांच्या बदल्या  : अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचे आदेश

ही शस्त्रक्रिया केली तर महापालिका देणार 1100 रु.

: सोबत नातेवाईक आणला तर त्यालाही 200 रु.

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने कुटुंब कल्याण कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग वाढवण्यासाठी पुरुष नसबंदी मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यास महापालिका 1100 रुपये देणार आहे. तर सोबत नातेवाईक घेऊन आल्यास त्या नातेवाईकाला 200 रुपये दिले जातील. 9 ते 28 मे या कालावधीत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिकेच्या प्रमुख 5 दवाखान्यामध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर प्रसूतिगृह, बोपोडी या दवाखान्यात 9 ते 11 मे या कालावधीत, कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतिगृह, कोथरूड येथे 12 ते 14 मे, कै. काशिनाथ अनाजी धनकवडे प्रसूतिगृह, बालाजीनगर या ठिकाणी 17 ते 19 मे, राजमाता जिजाऊ प्रसूतिगृह, मित्रमंडळ या दवाखान्यात 23 ते 25 मे तर कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ या दवाखान्यात 26 ते 28 मे या कालावधीत हे शिबीर असेल. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबीर असेल.
महापालिकेच्या जाहीर प्रकटनानुसार ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची असते. त्याचा लाभार्थीला त्रास होत नाही. तसेच याचा पुरुषत्वावर देखील परिणाम होत नाही. प्रकृतीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यास महापालिका 1100 रुपये देणार आहे. तर सोबत नातेवाईक घेऊन आल्यास त्या नातेवाईकाला 200 रुपये दिले जातील.