IAS Vikram Kumar | PMC Contract Employees | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत पुणे महापालिका सकारात्मक | मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला विश्वास

HomeBreaking Newsपुणे

IAS Vikram Kumar | PMC Contract Employees | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत पुणे महापालिका सकारात्मक | मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला विश्वास

Ganesh Kumar Mule Oct 17, 2023 12:48 PM

Pune Pustak Mahotsav | PMC Pune | पुणे महापालिका विश्वविक्रम करणार
PMC Pune Employees | पुणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तांच्या मनमानी कारभाराला राज्य सरकारकडून चपराक
PMC Pune Employees | महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे महापालिका कर्मचाऱ्यांना भोवणार 

IAS Vikram Kumar | PMC Contract Employees | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत पुणे महापालिका सकारात्मक | मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला विश्वास 

 
IAS Vikram Kumar | PMC Contract Employees | ‘जर एकही दिवस या कामगारांनी काम बंद केले तर शहराची परिस्थिती किती वाईट होईल?, दिवाळी, गणपती, नवरात्र प्रत्येक वेळी कर्मचारी कामावर हजर असतात. महापालिका प्रशासन कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक विचार करत आहे. असा विश्वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला. गेल्या चार दिवसापासून कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आयुक्तांनी दाखवलेला विश्वास त्यांना दिलासा मानला जात आहे. (IAS Vikram Kumar | PMC Contract Employees)
पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) (PMC Kamgar Union) व कर्मचारी राज्य बिमा निगम,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्रमिक भवन येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ई.एस.आय. सी. कार्ड शिबिराचे (ESIC Card Campaign) उद्घाटन आज संपन्न झाले.
विक्रम कुमार आयुक्त पुणे मनपा,चंद्रशेखर पाटील डेप्युटी डायरेक्टर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात कंत्राटी कामगारांना  ई.एस.आय. सी. कार्ड देण्यात आले.
विक्रम कुमार – आयुक्त -पुणे मनपा, अरुण खिलारी – मुख्य कामगार अधिकारी पुणे मनपा, संदिप कदम – उपायुक्त पुणे मनपा, चंद्रशेखर पाटील – ई.एस.आय. सी. डेप्युटी डायरेक्टर, चंदन प्रभाकर -ई.एस.आय. सी. असिस्टंट डेप्युटी डायरेक्टर, सुभाष शर्मा -ई.एस.आय. सी. सुप्रिडेंट पुणे, कॉ. उदय भट – अध्यक्ष- पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त), कॉ. मुक्ता मनोहर – जनरल सेक्रेटरी- पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त), सी.पी.औदुच्य – कायदेशीर सल्लागार कॉ. मधुकर नरसिंगे – कार्याध्यक्ष व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (Pune Municipal Corporation Employees)
‘इ.एस.आय.सी नेहमीच कामगारांना चांगले व दर्जेदार उपचार देण्यासाठी प्रयत्नशील असते, इ.एस.आय.सी सोबत इतर 8 प्रकारच्या योजना कर्मचाऱ्यांसाठी राबवल्या जातात. सर्व कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे चंद्रशेखर पाटील डेप्युटी डायरेक्टर यांनी म्हटले.’ (Pmc Pune)
कंत्राटी कामगारांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यानंतर ऐनवेळी इ.एस.आय.सी कार्ड काढण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची धावपळ होते, व त्यामुळे उपचार घेण्यास विलंब होतो व नाहक त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. या वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांना लक्षात घेऊन एकाच जागी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी आजपासून झोन क्रमांक 1 मधील येरवडा – कळस धानोरी, नगररोड – वडगाव शेरी, ढोले पाटील रोड या क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ई. एस. आय. सी कार्ड काढून देणे व इतर कार्ड संदर्भातील दुरुस्ती या शिबिरात होणार आहे.
झोन क्रमांक १ मधील सर्व कंत्राटी कामगारांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद आजच्या शिबिरास दिला.
इतर झोन मधील क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना तारीख व वेळ कळवली जाईल तेव्हा सर्व कामगारांनी आपले ई. एस. आय.सी. कार्ड काढण्यासाठी श्रमिक भवन येथे यावे. असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
—-