IAS Naval Kishore Ram Vs MNS | फक्त गोंधळ घालणे हाच मनसे कार्यकर्त्यांचा हेतू होता | महापलिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केली भूमिका
| सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणार
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त कार्यालयात मनसे कार्यकर्ते आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. त्यावर आता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मनसे कार्यकर्ते कुठले विकासात्मक काम घेऊन माझ्याकडे आले नव्हते, तर फक्त गोंधळ घालण्याच्या हेतूने माझ्याकडे आले होते. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. अशी भूमिका महापालिका आयुक्त यांनी “The कारभारी” शी बोलताना मांडली. (Pune Municipal Corporation – PMC)
महापालिका आयुक्त बंगल्यातील गायब झालेल्या साहित्य प्रकरण वरून मनसे नेते किशोर शिंदे आणि काही कार्यकर्ते महापालिका आयुक्त यांना भेटायला गेले होते. मात्र आयुक्त यांनी विभाग प्रमुख यांच्या सोबत बैठक ठेवली होती. त्यात ते व्यस्त होते. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बैठकीत जात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मनसे ची ही भूमिका महापालिका आयुक्त यांना रुचली नाही. त्यामुळे मग आयुक्त आणि मनसे नेते किशोर शिंदे यांच्या शाब्दिक चकमक झाली. शिवाय मनसे कार्यकर्त्यांनी नंतर आयुक्त यांच्या दालना बाहेर ठिय्या देखील मांडला. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आयुक्त राम यांनी सांगितले कि, मनसे कार्यकर्ते हे फक्त गोंधळ घालण्याच्या हेतूने आमची बैठक चालली असलेल्या ठिकाणी आले. त्यांचे कुठले विकासात्मक काम असते तर आम्ही समजून घेतले असते. मात्र त्यांचे तसे कुठले नागरिकांचे प्रश्न नव्हते. फक्त गोंधळ घालणे हा एकच अजेंडा होता. कुठलेही नागरिकांचे प्रश्न घेऊन न येता बैठकीत येऊन हातवारे करून माझ्या अधिकाऱ्या समोर असे बोलणे योग्य नव्हते. शिवाय त्यांनी धमकीची भाषा वापरली आहे. त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत.
——-
किशोर शिंदे काय म्हणाले?
दरम्यान या शाब्दिक चकमक नंतर मनसे नेते किशोर शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांच्या दालना बाहेर ठिय्या मांडला. याबाबत आपली भूमिका मांडताना किशोर शिंदे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले कि, महापालिका आयुक्त बंगल्यातील गायब झालेल्या साहित्य प्रकरण वरून मी आणि काही कार्यकर्ते महापालिका आयुक्त यांना भेटायला गेले होते. मात्र आयुक्तांनी आम्हाला लवकर वेळ दिली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या केबिन मध्ये गेलो. आयुक्त यांनी आम्हाला गुंड म्हणून संबोधले. मी देखील वकील आहे. मी कुठलीही चुकीची भूमिका घेतली नाही. आम्ही चुकलो असेल तर आमच्यावर कारवाई करावी. मात्र मी देखील या बाबत न्यायालयात जाणार आहे.
COMMENTS