माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे| डॉ. सिद्धार्थ धेंडे
| प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्व धर्मीयांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन
संपूर्ण जगात शांतता नांदण्याची गरज आहे. सर्व जाती-धर्मामध्ये भाईचारा निर्माण व्हायला हवा. स्वतःच्या धर्माचा अभिमान असायलाच पाहिजे. मात्र इतर धर्माचा द्वेष करणे योग्य नाही. जगात माणूसकी हाच श्रेष्ठ धर्म आहे, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनच्या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील कै. नटराज गंगावणे सभागृहात डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते धेंडे बोलत होते. या वेळी प्रत्येक घरात ईद साजरी व्हावी यासाठी गरजूंना शिरखुर्मा साहित्य किट प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेविका फरझाना शेख, आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अयुब शेख, पुणे शहर भाजपा प्रवक्ते मंगेश गोळे, हिंदू संस्कृती मंचाचे दिलीप म्हस्के, शिख समाजाच्या वतीने सरबतजीतसिंग सिंधू, बौध्दाचार्य रमेश गाडगे, यासिन शेख, ख्रिश्चन समाजाच्या वतीने महापुरे, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव घाडगे, हुसेन शहा बाबा दर्गा ट्रस्टचे रज्जाकभाई, मुश्ताकभाई तसेच प्रभागातील हमारी तंजीम व जामा मजीद ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करायला सुरैया शेख, सईदा शेख, नझिम शेख, पप्पु मगदुम, फिरोज शेख, नुमान शेख, अनवर देसाई, फिरदोस शेख, विजय कांबळे, गजानन जागडे, वसंत दोंदे, अल्हाबक्ष, भिमराव जाधव , गणेश पारखे व ईतर सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.
डॉ. धेंडे म्हणाले की, जगाला प्रेम अर्पण करण्याची शिकवण सर्व धर्मांमध्ये दिली जात आहे. कोणताही धर्म एकमेकांच्या विरोधात उभा राहण्याची मुभा देत नाही. माणसांनी एकमेकांचा द्वेष करायला सुरूवात केली. माणसांनीच भेदाभेद निर्माण केला. धर्माचा योग्य अभ्यास केल्यास मानवतावादी भावना सर्वांमध्ये वाढेल. पुढे तीच भावना माणसांनी पुढे घेऊन जाणे गरजेचे असल्याचे डॉ. धेंडे म्हणाले.
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रभागात जोपासला सामाजिक एकोपा : अय्युब शेख –
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने गेल्या 17 वर्षांपासून प्रभागात ईफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. प्रभागात सामाजिक एकोपा वृर्द्धींगत व्हावा, सर्व जाती धर्मात शांतता नांदावी, सर्व जाती धर्मात प्रेम भावना वाढावी या उद्देशाने उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये सर्व धर्मियांना एकत्रित करून भाईचारा वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे. गेल्या वर्षांपासून महिलांसाठी देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करून नवीन आदर्श डॉ. धेंडे यांनी निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अय्युब शेख यांनी केले.