HSRP | ‘एचएसआरपी’ करिता शुल्क भरण्याकरिता अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन

Homeadministrative

HSRP | ‘एचएसआरपी’ करिता शुल्क भरण्याकरिता अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule Jul 07, 2025 9:07 PM

Pune Power Supply | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वीज पुरवठा विस्कळीत | महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी
Aashadhi Wari 2025 | सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश | आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा
Maharashtra Cabinet Meeting Decisions |आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या

HSRP | ‘एचएसआरपी’ करिता शुल्क भरण्याकरिता अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन

 

Vehicle HSRP – (The Karbhari News Service) – वाहनधारकांनी वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविताना http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच शुल्क भरण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. (Marathi News)

सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे अत्यावश्यक आहे. या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनधारकांनी वाहनांवर एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहनही श्री. भोसले यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: