Hong Kong Lane Pune | Pune PMC | महापालिका प्रशासनाकडून मुख्य सभेच्या ठरावाचा अवमान | महापालिकेचे लाखोंचे नुकसान

HomeBreaking Newsपुणे

Hong Kong Lane Pune | Pune PMC | महापालिका प्रशासनाकडून मुख्य सभेच्या ठरावाचा अवमान | महापालिकेचे लाखोंचे नुकसान

गणेश मुळे Jan 22, 2024 6:33 AM

Sharad Pawar | Kasba | कसबा जिंकण्याची आम्हांला अपेक्षा नव्हती | शरद पवार
PMC Vaccination Drive | पुणे महापालिका आगामी तीन महिने राबवणार लसीकरण मोहीम | लहान मुले आणि गरोदर मातांना लाभ
PMC Pune | Recruitment | कशी झाली पुणे महापालिका भरती प्रक्रिया? | जाणून घ्या सविस्तर!

Hong Kong Lane Pune | महापालिका प्रशासनाकडून मुख्य सभेच्या ठरावाचा अवमान | महापालिकेचे लाखोंचे नुकसान

Hong Kong Lane Pune | डेक्कन टॉकीज बोळातील (R Deccan Mall) अर्थात हॉंगकॉंग लेन (Hong King Lane Pune) मधील 25 स्टॉल चे पक्के बांधकाम करण्याबाबत 1986 साली मुख्य सभेने (Pune Municipal Corporation General Body Proposal) ठराव केला होता. त्यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळणार होते. मात्र महापालिका प्रशासनाकडून या ठरावाची अंमलबजावणीच करण्यात आली नाही. हा एक प्रकारे मुख्य सभेचा अवमान असतो. त्यामुळे तुटपुंज्या उत्पन्ना वरच महापालिकेला समाधान मानावे लागत आहे. दुसरीकडे स्टॉलधारक मात्र महिन्याला लाखों कमावत आहेत. त्यामुळे आता तरी महापालिका लेन मध्ये पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करून गाळे ज्यादा दराने देणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Pune Municipal Corporation News)
पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील (Deccan Gymkhana Area Pune) आणि एफसी रोडवरील (FC Road Pune) डेक्कन टॉकीज आता आर डेक्कन मॉल (R Deccan Mall) बोळात महापालिकेच्या मालकीची जागा आहे. या ठिकाणी 25 गाळे आहेत. यात सर्व प्रकारच्या वस्तू ग्राहकांना मिळतात. पुण्यात इतरत्र कुठे मिळत नसेल ते इथे मिळते, अशी त्याची आख्यायिका आहे. यामध्ये मोबाईल ऍक्सेसरीज, घड्याळ, महिला आणि पुरुषासाठी आवश्यक सौंदर्य प्रसाधने अशा गोष्टी इथे मिळतात. ही मोक्याची जागा असल्याने इथल्या दुकानदारांना महिन्याला लाखों रुपये मिळतात. मात्र महापालिकेची ही जागा असून देखील महापालिकेला तुटपुंज्या भुई भाड्यावर समाधान मानावे लागते. मात्र यात महापालिका प्रशासनचीच चूक आहे. (Hong Kong lane FC Road Deccan Pune)
कारण  [हॉन्गकॉग लेन] स्टॉल पक्के बांधकाम – करणेबाबत स्टॉल धारकांनी १८/११/८५ पत्र देऊन महापालिकेकडे मागणी केली होती. त्यात म्हटले होते कि,  डेक्कन डॉकिजच्या बोळात एकूण १० x ५ फूट या मापाचे २५ स्टॉल्स महानगरपालिकेने भुईभाड्याने दिलेले आहेत. स्टॉल्स अत्यंत मोडकळीस आल्याने व पावसाने उगल्याने त्या ठिकाणी लाकडी स्टॉल्स ऐवजी त्याच मापाचे गाळे पक्क्या स्वरुपाचे बांधणे आवश्यक आहे. याबाबत भूमी प्रापण, आरोग्य, विकास योजना, पथ विभाग, भवन रचना विभाग व बांधकाम परवानगी विभाग कडील अभिप्राय मागविले असता सर्व खात्याचे अभिप्राय अनुकूल आलेले होते. त्यानुसार स्थायी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेने ठराव मान्य केला होता. 

| काय होता 1 सप्टेंबर 1986 ला झालेला मुख्य सभेचा ठराव?

डेक्कन टॉकीजच्या बोळांत एकूण १० फूट बाय ५ फूट या मापाचे एकूण २५ स्टॉल्स मनपाने भुईभाड्याने दिलेले आहेत. सदरचे स्टॉल्स अत्यंत मोडकळीस आल्याने व पावसाने कुणल्याने त्या ठिकाणी लाकडी स्टॉल्स ऐवणी त्याच मापाचे गाळे पक्क्या स्वरूपाचे बांधणे व तेथे सध्या असलेल्या स्टॉल्सधारकांना मा.महा.आयुक्त यांच्या पत्रांतील १ ते १९ अटींवर ३० वर्षे कराराने महा.आयुक्त यांच्या पत्रासोबतच्या नकाशांत दर्शविल्याप्रमाणे दुकानासाठी जागा भाड्याने देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

The Karbhari - Hong kong lane Pune PMC GB Proposal

| प्रशासनाने काय करायला हवे?

महापालिका प्रशासन खासकरून महापालिका आयुक्त आणि अतिक्रमण विभागाने यावर अंमल करणे गरजेचे होते. मात्र अद्याप पर्यंत यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सद्यस्थितीत महापालिकेला प्रति दुकानाकडून प्रति दिवशी 200 रुपयाचे भाडे मिळते. ठरावावर अंमल झाला असता तर पालिकेला प्रति दिवशी 1000 रुपये मिळाले असते. शहरात महापालिकेच्या अशा बऱ्याच जागा आहेत जिथे पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करून गाळे लिलाव पद्धतीने द्यायला हवे आहेत. सारस बागेजवळील जागा ही अशीच आहे. तिथे महापालिकेने फूड मॉल करण्याचे नियोजन केलेले आहे. त्याच धर्तीवर हॉंगकॉंग लेन मध्ये देखील दोन मजली इमारतीचे बांधकाम करून गाळे लिलाव पद्धतीने द्यायला हवेत. यातून महापालिकेला देखील चांगले उत्पन्न मिळेल.