Holiday on PMC Election | १५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी किंवा विशेष सवलत | महापालिका आयुक्त यांचे परिपत्रक जारी
PMC Election 2026 – (The Karbhari News Service) – १५ जानेवारी २ रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता मतदार संघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी किवा सवलत द्यावी. असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाला दिले आहेत. (Pune PMC News)
आयुक्त यांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे कि, आपल्या देशाने लोकशाही राज्य पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वयंप्रेरणेने मतदान करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते.
राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे १५ जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये पुणे शहराच्या क्षेत्रामधील सर्व मतदार / पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले अधिकारी/कर्मचारी यांना (अत्यावश्यक सेवा व निवडणूक कामकाज वगळून) मतदानाच्या दिवशी त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्यात यावी. ज्या अधिकारी/कर्मचारी यांना सुट्टी देणे शक्य नाही अशा अत्यावश्यक सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांना त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संबंधित विभागप्रमुख यांचेकडून दोन ते तीन तासांची विशेष सवलत देण्यात यावी. असे आयुक्तांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.

COMMENTS