Hoarding in front of PMC Building | पुणे महापालिका भवनासमोर उभारलेल्या वादग्रस्त होर्डिंगवर अखेर कारवाई! 

HomeBreaking Newsपुणे

Hoarding in front of PMC Building | पुणे महापालिका भवनासमोर उभारलेल्या वादग्रस्त होर्डिंगवर अखेर कारवाई! 

गणेश मुळे May 17, 2024 2:22 PM

Pramod Nana Bhangire | प्रमोद नाना भानगिरे, पुणे महापालिका आयुक्तांसमवेत भर पावसात थेट एकता नगर मध्ये दाखल! 
Transfer of IAS Dr. Kunal Khemnar! | Prithviraj BP is the new Additional Commissioner of Pune Municipal Corporation
PMC Primary Education Department | पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील ३३६ कर्मचाऱ्यांचे कायम रिक्त पदावर समायोजन!

Hoarding in front of PMC Building | पुणे महापालिका भवनासमोर उभारलेल्या वादग्रस्त होर्डिंगवर अखेर कारवाई!

 

PMC Sky Sign Department- (The Karbhari News Service) जागा निश्चित न करता पीएमपी (PMPML) ने परवानगी दिलेल्या आणि महापालिका भवना (PMC Building) समोर एका रात्रीत उभारलेल्या होर्डिंग (Hoarding) वर अखेर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुणे महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत महापालिकेच्या गेटवर होर्डींग उभारण्याचे काम केले जात होते.  यात महापालिकेचा सावळा गोंधळ तर समोर आलाच आहे; शिवाय पीएमपी प्रशासन आणि महापालिका प्रशासनात समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. होर्डिंग काढले असले तरी संबंधित होर्डिंग धारक आणि संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाणार, याबाबत आता लक्ष लागून राहिले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

मुंबईतील  घटना ताजी असतानाही ऐन वर्दळीच्या ठिकाणी ‘पीएमपी’कडून हाेर्डिंग उभारले जात आहे. पुणे महापालिकेच्या  आकाश चिन्ह व परवाना विभागाने या हाेर्डिंगला आणि झाडाच्या फांद्या कापण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, झाडाच्या फांद्या तोडून होर्डिंगची उभारणी करू नये, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले हाेते. त्यानंतरही चक्क महापालिकेच्याच दारात आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करून हाेर्डिंग उभारले गेले. अनधिकृत, धोकादायक होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर असताना पालिका मुख्य इमारतीसमोरच होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी देत आहे. अगोदरच पीएमपीच्या बसमुळे कायम महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर वाहनांची गर्दी असते. अशात भर रस्त्यावर पीएमपीला होर्डिंग उभारण्याची परवानगी दिली आहे. नियमात नसतानाही अशा प्रकारे होर्डिंग उभारण्यास महापालिका अधिकारी परवानगी देत असल्याने होर्डिंगच्या परवानगी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आकाशचिन्ह विभागाकडून होर्डींगचा आढावा घेतला. त्यावेळी  वृक्षतोड करून  होर्डिंग उभारण्यात आलेल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी असे होर्डींग काढून टाकण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. महापालिकेच्या जागेतच हे होर्डींग उभारले जात असल्याची माहिती आकाशचिन्ह विभाग आणि ज्या विभागाच्या ताब्यात ही जागा आहे त्या विद्युत विभागालाही नव्हती. त्यामुळे या दोन्ही विभागांनी हात वर केले आहेत. त्यामुळे, एका बाजूला आयुक्त जाहिरात फलकांबाबत कारवाईचे आदेश देत असतानाच दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या दारातच सुरू असलेला हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. तर, चक्क भर रस्त्यात ही परवानगी देण्यात आल्याने याबाबत उलट-सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या समोरच महापालिकेने ई- वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारले आहे. याच ठिकाणी पीएमपीचे पास केंद्र आहे. या केंद्राच्या समोर आणि चार्जिंग स्टेशनच्या आवारात जाहिरात फलक लावण्यासाठी भला मोठे लोखंडी खांब उभारण्यात आला होता. त्यानंतर एका रात्रीत स्ट्रक्चर उभारण्यात आले होते. मात्र पुन्हा यावर टीका झाल्याने तत्काळ हे स्ट्रक्चर काढून घेण्यात आले.

——
संबंधित स्पेक्ट्रम एडवरटायझिंग च्या होर्डिंग   ला पीएमपीएलने परवानगी दिलेली होती. परवानगी देताना होर्डिंग पीएमसी बस स्टॉप लगत म्हणून परवानगी देण्यात आलेली होती. परंतु त्यांनी जागा निश्चिती करून घेतलेले नव्हते. यामुळे सदरचे होर्डिंग काढण्यात आलेले आहे. याबाबत अधिक चौकशी केली जाईल. तसेच संबंधित जागेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया खाते स्तरावर सुरु करण्यात आली आहे.
माधव जगताप, उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग.