Hinjewadi- Shivajinagar Metro | हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो साठी केंद्र शासनाकडून  ४१० कोटी प्राप्त

HomeBreaking Newsपुणे

Hinjewadi- Shivajinagar Metro | हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो साठी केंद्र शासनाकडून ४१० कोटी प्राप्त

कारभारी वृत्तसेवा Nov 02, 2023 4:35 PM

Man-Hinjewadi-Shivajinagar Metro Project | माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन – ३ प्रकल्पास अर्बन इन्फ्रा ग्रुपकडून  PPP मेट्रो प्रकल्प पुरस्कार 
Man-Hinjewadi to Shivajinagar Metro | माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
PMRDA receives Rs. 410 cr from Centra Government for the Pune Metro Line

Hinjewadi- Shivajinagar Metro | हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो साठी केंद्र शासनाकडून  ४१० कोटी प्राप्त

Hinjewadi – Shivajinagar Metro | माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन (Man-Hinjewadi- Shivajinagar Metro Line) साठी  ४१० कोटी केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. सदर निधी प्राप्त झाल्यामुळे प्रकल्पाची गती वाढून प्रकल्पाचे काम लवकर पुर्ण होण्यास मदत होणार आहे. अशी माहिती PMRDA च्या वतीने देण्यात आली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत २३.२०३ कि.मी. लांबीचा व रु.८३१३ कोटी इतक्या अंदाजित खर्चाचा पुणे मेट्रो लाईन – ३ माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाने ०९ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. या सवलतकार कंपनीमार्फत करण्यात येत आहे. प्रकल्पाचा सवलतकरारनामा २१ सप्टेंबर २०१९ रोजी स्वाक्षांकित करण्यात आला आहे. तसेच, २५ नोव्हेंबर २०२१ रोजी देण्यात आली असून  प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत.
सदर मेट्रो प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर राबविण्यात येत असलेने या प्रकल्पाकरिता केंद्र शासनामार्फत एकूण रु. १,२२५ कोटी इतका व्यवहार्यता तफावत निधी अपेक्षित आहे. प्रकल्पाचे सवलतकार पुणे आयटी सीटी मेट्रो रेल लिमिटेड यांनी १००% Equity ची गुंतवणूक केली असुन त्याप्रमाणात बँकेद्वारे कर्ज पुरवठा करण्यात आल्यामुळे केंद्र शासनास रु. १,२२५ कोटी पैकी रु. ४१० कोटी मिळणेबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणामार्फत केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालयाकडे सादर करण्यात आला होता.
प्राधिकरणाचे आयुक्त श्री. राहुल महिवाल, मुख्य अभियंता श्रीमती रिनाज पठाण यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मिळाला.
——
माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन साठी  ४१० कोटी केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. सदर निधी प्राप्त झाल्यामुळे प्रकल्पाची गती वाढून प्रकल्पाचे काम लवकर पुर्ण होण्यास निश्चितच मदत होईल.
राहुल  महिवाल, महानगर आयुक्त, पीएमआरडीए, पुणे