Hinjewadi IT Park | हिंजवडीतील पावसाच्या पाण्यावर उपाययोजनांबाबत पाहणीसह बैठक!

Homeadministrative

Hinjewadi IT Park | हिंजवडीतील पावसाच्या पाण्यावर उपाययोजनांबाबत पाहणीसह बैठक!

Ganesh Kumar Mule Jun 17, 2025 10:48 AM

Environment Law | Shivsena UBT | पर्यावरण हिताचा कायदा पुन्हा लागू करण्यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
PMC Health Department | तर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केली जाणार कारवाई | आरोग्य प्रमुखांचा इशारा
Pune Property Tax Abhay Yojana | पुणे शहर आणि समाविष्ट गावातील मिळकतधारकांसाठी महत्वाची बातमी | मिळकत कर विभागाची विशेष अभय योजना!

Hinjewadi IT Park | हिंजवडीतील पावसाच्या पाण्यावर उपाययोजनांबाबत पाहणीसह बैठक!

 

Hinjewadi Rain – (The Karbhari News Service) – हिंजवडी फेज १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ते दुरुस्ती आणि नागरी सुविधांबाबत सोमवारी (दि.१६) पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अध‍िकारी व‍िजय राठोड यांनी अध‍िकारी यांच्यासह पाहणी केली. त्यानंतर हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन येथे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. (Pune PMRDA)

* प्रमुख निर्देश:

* डॉल्फिन आणि साई प्रोविजो इमारतीजवळील उपाययोजना:
पावसाळी पाण्याचा निचरा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाणार.
* राडाराडा व्यवस्थापन:
मेट्रो मार्गासह परिसरात पडलेला राडाराडा त्वरित हटवून योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे निर्देश.
* प्रदूषणविरोधी कारवाई:
नैसर्गिक नाल्यात प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाईसाठी आदेश.
* नैसर्ग‍िक नाले खुले करावेत:
बंद केलेले नैसर्गिक नाले खुले करत मार्गातील राडारोडा दूर करावा. ड्रेनेज लाईनची स्वच्छता/दुरुस्तीचे आदेश.

यावेळी पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास व परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता न‍ितीन वानखेडे, ह‍िंजवडी वाहतूक व‍िभागाचे पोलीस न‍िरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्यासह व‍िव‍िध व‍िभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत ११ जून २०२५ रोजी पीएमआरडीचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: