Water Supply Department | मनपाच्या पाणीपुरवठा विभागाची उच्चांकी वसुली | वर्षभरात 150 कोटींचे उत्पन्न

HomeBreaking Newsपुणे

Water Supply Department | मनपाच्या पाणीपुरवठा विभागाची उच्चांकी वसुली | वर्षभरात 150 कोटींचे उत्पन्न

Ganesh Kumar Mule Apr 01, 2023 1:22 PM

MLA Sunil Kamble | संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्याचे प्रश्न विधानसभेत मांडणार | आमदार सुनील कांबळे
Water Uses | महापालिकेच्या ज्यादा पाणी वापरामुळे पाणीटंचाई! | जलसंपदा विभागाने राज्य सरकारकडे केली महापालिकेची तक्रार
Kothrud Police Pune  | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोथरुडच्या जिगरबाज पोलिसांचा सत्कार

मनपाच्या पाणीपुरवठा विभागाची उच्चांकी वसुली | वर्षभरात 150 कोटींचे उत्पन्न

पाणी पुरवठा विभागाने (PMC water supply department) या वर्षी उच्चांकी उत्पन्न वसूल केले आहे. मागील वर्षी 121.84 Cr इतके उत्पन्न मिळाले होते. या वर्ष अखेर 149.29 Cr उत्पन्न मिळालेले आहे. मागील वर्षीपेक्षा जवळपास 50 कोटी अधिक उत्पन्न खात्याने मिळवले आहे. अशी माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar) यांनी दिली.  (PMC Pune)

पावसकर यांच्या माहितीनुसार वर्षभरा साठी केलेले नियोजन, स्वतंत्र निर्माण करण्यात आलेला मीटर सेल, शासकीय कार्यालयात केलेला सततचा पाठपुसावा, नळजोड तोडण्याच्या केलेल्या मोठ्या कारवाया, अभियंते आणि मीटर रीडर यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न, इत्यादी मुळे हे शक्य झालेले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी च्या उत्पन्नाचा विचार करता, खात्याने तब्बल 50 कोटी अधिक उत्पन्न मिळवलेले आहे ही बाब लक्षणीय आहे. (Pune Municipal Corporation)

प्रमुख थकबाकी वसुली ज्या संस्था कडून करण्यात आली, त्या मध्ये खडकी अम्मुनेशन फॅक्टरी (Ammunition Factory) , Garrison Engineer, खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (Khadki and Pune Cantonment board), ससून, जहांगीर नर्सिंग होम, येरवडा जेल, मेंटल हॉस्पिटल, जेल प्रेस, इत्यादी चा समावेश आहे.

—-

आगामी आर्थिक वर्षामध्ये थकबाकी वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, या पेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त होईल या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

अनिरुद्ध पावसकर, विभाग प्रमुख, पाणीपुरवठा विभाग.