Heavy Rain in Pune | पुणे आणि परिसरात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता!   | प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज  

HomeपुणेBreaking News

Heavy Rain in Pune | पुणे आणि परिसरात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता!  | प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज  

Ganesh Kumar Mule Sep 23, 2023 9:46 AM

Pune PMC News | जीएसटी च्या अनुदानातून जलसंपदा विभागाची थकबाकी वळती करून घेतली जाणार | पुणे महापालिकेवर 187 कोटींचा आणखी एक बोजा
Stamp Duty | Abhay Yojana | मुद्रांक शुल्क, दंडातील सवलतीसाठी अभय योजना लागू
PMC Labour Welfare Department | पुणे महापलिका कर्मचाऱ्यांच्या पाल्याकडून मागवले अर्ज! 

Heavy Rain in Pune | पुणे आणि परिसरात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता!

| प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज

पुणे | पुणे शहर (Pune City) आणि जिल्ह्यात (Pune District) पुढील ५ दिवस म्हणजे २३ ते २७ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाकडून (Regional Meteorological center Mumbai) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Heavy Rain in Pune)

गेल्या आठवड्यापासून राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाउस कोसळतो आहे. नुकतेच नागपूर शहरात पावसाने दाणादाण उडवून दिले. दरम्पुयान पुणे शहर आणि परिसरातही गेल्या दोन दिवसापासून पाउस पडतो आहे. पुण्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. दरम्यान मुंबई हवामान विभागाने पुणे आणि पुणे जिल्ह्यात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील ५ दिवस म्हणजे २३ ते २७ सप्टेंबर पर्यंत म्हणजेच आजपासून येत्या बुधवार पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


News Title|Heavy Rain in Pune | Chance of heavy rain for the next 5 days in Pune and the surrounding area! | Regional Meteorological Department forecast