Hagawane Family News | हगवणे कुटुंबावर मकोका नुसार कारवाई करावी – सुनील माने

HomeBreaking News

Hagawane Family News | हगवणे कुटुंबावर मकोका नुसार कारवाई करावी – सुनील माने

Ganesh Kumar Mule May 22, 2025 8:20 PM

Ajit Pawar in PMC | अजित पवार यांनी पुणे महापालिकेत येऊन घेतला मदत कार्याचा आढावा!
Social Awareness of DCM Ajit Pawar : भाषण थांबवून अजित पवारांनी जपली सामाजिक बांधिलकी 
Maharashtra Budget 2024-25 | अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला अंतरिम अर्थसंकल्प | जाणून घ्या काय आहेत योजना

Hagawane Family News | हगवणे कुटुंबावर मकोका नुसार कारवाई करावी – सुनील माने

 

Vaishnavi Hagawane News – (The Karbhari News Service) – वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबीय त्यांच्या सुनांचा अतोनात छळ करत होते हे समोर आले आहे. एका सुनेला मारहाण करून दुसऱ्या सुनेचा हुंडा बळी घेणाऱ्या हगवणे कुटुंबावर माकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता सुनील माने यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी ई –मेल द्वारे पाठवले आहे. (Sunil Mane Pune)

त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. तिच्या आत्महत्येनंतर तिचा सासरच्या लोकांकडून किती छळ होत होता हे समजले. त्याचप्रमाणे हगवणे कुटुंबतील मोठ्या सुनेचा देखील छळ होत होता याचीही माहिती मिळाली. अशाप्रकारे सुनांचा छळ करून एका सुनेचे हुंडाबळी घेणाऱ्या हगवणे कुटुंबाला मकोका लावावा व या सर्वांना शेवटपर्यंत तुरुंगात टाकावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

औंधमधील गायकवाड परिवारातील सुनेच्या अशाच छळप्रकरणी आदरणीय शरद पवार साहेबांनी योग्य ती दखल घेत गुन्हेगारांना मकोका लावण्याची सूचना केली होती. त्या सुनेला त्यामुळे किमान न्याय तरी मिळाला. हगवणे कुटुंबीयांनी औंधमधील प्रकरणाचीही पुढची पायरी गाठली आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने मकोकानुसार गुन्हा दाखल करावा, पोलिसांनी त्यानुसार कारवाई करावी अशा सूचना आपण पालकमंत्री म्हणून द्याव्यात अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: