Hadapsar Vidhansabha | हडपसर विधानसभा मतदार संघातून प्रमोद नाना भानगिरे हे महायुतीचे उमेदवार?
| महायुती कडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता
Pramod Nana Bhanigre – (The Karbhari News Service) – हडपसर विधानसभा मतदार संघातून शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना महायुती कडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याला कारण आहे अजित पवार यांच्या संभाव्य २० उमेदवारांची यादी. कारण यात पुण्यातून वडगावशेरी साठी सुनील टिंगरे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मात्र हडपसर मधून मात्र नाव घोषित करण्यात आले नाही. सध्या या मतदार संघात चेतन तुपे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. तरीही हे नाव नाही. याचाच अर्थ असा मानला जात आहे कि, महायुती कडून ही जागा शिवसेनेला दिली जाईल. भानगिरे हे या मतदार संघाचे प्रबळ उमेदवार आहेत. (Ajit Pawar NCP Candidate List)
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होत आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत. महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी समोर आली आहे.
अजित पवार गटाची नुकतंच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या उमेदवारांच्या नावांची यादीही समोर आली आहे. यानुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे दिसत आहे. तर बीड परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. तर पुण्यातून सुनील टिंगरे यांचे नाव आहे.
दरम्यान महायुतीचे जागावाटप अजून झाले नसले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील काही जगासाठी अडून बसले आहेत. यात हडपसर ची जागा मुख्यमंत्री मागू शकतात. कारण या मतदारसंघात प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून खूप विकासकामे करण्यात आली आहेत. तसेच नुकतेच अजित पवार हे देखील भानगिरे यांच्या श्रीरामाच्या मंदिराला भेट देऊन गेले. अशातच पवार यांच्या पहिल्या यादीत तरी हडपसर साठी उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे ही जागा भानगिरे यांना मिळेल, असे खात्रीशीर रित्या मानले जात आहे.
अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी
बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
परळी – धनंजय मुंडे
कागल- हसन मुश्रीफ
दिंडोरी – नरहरी झिरवळ
रायगड – अदिती तटकरे
अहमदनगर – संग्राम जगताप
खेड – दिलीप मोहिते-पाटील
अहेरी- बाबा अत्राम
कळवण -नितीन पवार
इंदापूर – दत्ता भरणे
उदगीर- संजय बनसोडेट
पुसद – इंद्रनील नाईक
वाई खंडाळा महाबळेश्वर – मकरंद आबा पाटील
पिंपरी – अण्णा बनसोडे
मावळ – सुनील शेळके
अमळनेर- अनिल पाटील
जुन्नर – अतुल बेनके
वडगाव-शेरी – सुनील टिंगरे
COMMENTS