मराठा सेवा संघाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांना अभिवादन
मराठा सेवा संघाच्या वतीने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या ३३४ व्या स्मृतीदिन व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या १८० व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर व पुणे शहराचे माजी अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले.
यावेळी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड , माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, राजेंद्र भुतडा आदी प्रमुखांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सचिन आडेकर म्हणाले ” छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होतेच परंतु एक उत्तम शासक आणि धुरंधर सेनानी देखील होते. वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र स्फटिका सारखे स्वच्छ होते. महाराजा सयाजीराव गायकवाड हे राजर्षी शाहू महाराज यांचे आदर्श होते. त्यांनी सहकार्य केलेल्यांन पैकी अनेकांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कार्य सर्व देशातच नव्हे तर विदेशात देखील दखल घेतले गेले आहे.”
यावेळी बोलताना शिवश्री राजेंद्र कुंजीर म्हणाले ” महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने एक सांस्कृतिक भवन केले गेले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतले त्यांचे चांगले स्मारक करून त्यांचा विचार समाजात रुजविणे आपले कर्तव्य आहे.”
माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी यावेळी या सांस्कृतिक भवनाची माहिती दिली.
सारिका जगताप , गणेश सपकाळ, राकेश भिलारे , विजय जाधव , अनिल भिसे , प्रसन्न मोरे यावेळी उपस्थित होते.