आजी माजी नगरसेवक व कर्मचाऱ्यांच्या औषधावर 9 कोटी 30 लाख पडले खर्ची
: अजून दीड कोटींची आवश्यकता
: स्थायी समितीची मान्यता
योजने अंतर्गत पुणे मनपा आजी,माजी सेवक,सेवानिवृत्त सेवक व आजी,माजी मा.सभासदांना औषधे पुरविण्यासाठी नउ कोटी तीस लाख रकमेची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. निविदेतील एकविरा डिस्ट्रीब्युटर्स यांचेकडून जेनेरीक औषधे व इतर साहित्यांच्या छापील किंमतीवर सर्व करांसह ७७% डिस्काउंट व एस.बी.जोशी अॅन्ड कंपनी यांचेकडून बॅन्डेड औषधे व इतर साहित्यांच्या छापील किंमतीवर सर्व करासह ३६% इतका डिस्काउंट (सुट) घेउन औषधे व इतर साहित्य रक्कम रूपये नउ कोटी तीस लाखपर्यंत खरेदी करण्यास मान्यता दिलेली असून दोन्ही निविदाधारकांना सेट्रल मेडिकल स्टोअर्स गाडीखाना येथील जावक क्रमांक १४० दिनांक ३/८/२०२१ अन्वये कार्यादेश देण्यात आलेली आहे.
लोकल पर्चेस योजनेअंतर्गत औषधे घेणा-या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे तसेच सध्या आजाराचे प्रमाण ही
वाढले असल्याने उपलब्ध नउ कोटी तीस लाख टेंडर रक्कमेमधून या योजनेअंतर्गत रूग्णांना आतापर्यंत औषधे व इतर साहित्यांची खरेदी करून पुरवठा करण्यात आलेला आहे. तथापि या टेंडरची मान्य तरतूद रक्कम रूपये नउ कोटी तीस लाख संपत आल्यामुळे आवश्यक असणारे वाढीव औषधे खरेदी करणे अडचणीचे आहे. टेंडरमधील अटी क्रमांक क्रमांक ७ अन्वये टेंडर फॉर्ममध्ये नमुद केलेल्या परिणामापेक्षा जास्त मालाची महानगरपालिकेला जरूरी लागल्यास सदर परिणामापेक्षा ५० टक्यापर्यंत ज्यादा माल टेंडरमधील मान्य दरानेच पुरविणे टेंडरदारावर बंधनकारक राहील.या अटीनुसार या निविदेतील दोन पुरवठाधारकांना टेंडर मुदतीपर्यंत टेंडरमधील मान्य डिस्काउंट (सुट) प्रमाणे औषधे व इतर साहित्य पुरविणे बंधनकारक आहे. वाढीव औषधे खरेदी करण्यासाठी पुणे मनपाच्या अंदाजपत्रकातील एकूण खर्चाच्या रक्कमेतून रक्कम रूपये १,५०,००,०००/ वर्गीकरणादवारे उपलब्ध होणे शक्य आहे. असे प्रस्तावात म्हटले होते. त्यानुसार स्थायी समितीने या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
COMMENTS