पुणेकरांसाठी खुशखबर : अखेर अक्टीव रुग्णसंख्या १ हजाराच्या खाली
:मात्र काळजी घेणे आवश्यक
पुणे : राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुणे शहरात आढळून आला होता. तेंव्हापासून पुणेकर कोरोनाचा धीराने सामना करत आहेत. महापालिका आणि इतर प्रशासन देखील याचा प्रकोप कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच लास आल्यामुळे हे काम अधिकच सोपे झाले होते. तरीही शहरात अजूनही कोरोना रुग्णाची संख्या आढळून येतेच आहे. मात्र आता ही संख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे. कारण गेल्या कित्येक दिवसानंतर शहरातील अक्टीव रुग्णांची संख्या हजाराच्या खाली आली आहे. तीआता ९९४ झाली आहे. त्यामुळे कोरोना कमी झाल्याची ही चिन्हे मानली जात आहेत, तरीही काळजी घेणे आवश्यकच आहे.
: महापालिकेच्या उपाययोजनांना यश
शहरात कोरोनाचे थैमान अजूनही सुरूच आहे. मात्र आता त्याचा जोर कमी होताना दिसतो आहे. त्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना कामी आलेल्या दिसून येत आहेत. त्याला नागरिकांची देखिल चांगलीच साथ मिळाली आहे. कोरोनाचा कहर सुरु झाल्यापासून महापालिकेच्या वतीने विभिन्न उपाय योजना राबवल्या आहेत. त्याला केंद्र आणि राज्य सरकारची साथ मिळाली. त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या लास आल्यामुळे कोरोनाच कहर कमी होण्यात चांगलीच मदत मिळाली. लसीकरणात देखील राज्यात पुणेच पुढे आहे. एवढे करूनही शहरातील अक्टीव रुग्णांची सख्या कमी होत नव्हती. मात्र आता गेल्या दोन आठवड्यापासून याचा जोर पहिल्यापेक्षा कमी होताना दिसतो आहे. कारण आता अक्टीव रुग्णाची संख्या देखील कमी होताना दिसते आहे. गेल्या कित्येक दिवसानंतर अक्टीव रुग्ण संख्या हजाराच्या खाली आहे. अर्थातच रुग्ण संख्येचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे.
: अशी आहे आकडेवारी
– दिवसभरात 112 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 119 रुग्णांना डिस्चार्ज.
– 2 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
503357
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 994
– एकूण मृत्यू – 9067
– एकूण डिस्चार्ज- 493296
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- 4780
—
COMMENTS