Ghorpadi Flyover – MLA Sunil Kamble | तब्बल ४० वर्षांनी सुटणार घोरपडी मधील वाहतूक कोंडी   | आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयत्नांना यश

HomeBreaking Newsपुणे

Ghorpadi Flyover – MLA Sunil Kamble | तब्बल ४० वर्षांनी सुटणार घोरपडी मधील वाहतूक कोंडी | आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयत्नांना यश

गणेश मुळे Mar 10, 2024 6:13 AM

Pune Metro News | रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला झेंडा | पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन
Ajit Pawar on Bapu Pathare | आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत ; अजित पवारांचा माजी आमदार बापू पठारे यांना इशारा
Chandrasekhar Bawankule Vs NCP | राष्ट्रवादी काँग्रेसकडे नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करा |भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

Ghorpadi Flyover – MLA Sunil Kamble | तब्बल ४० वर्षांनी सुटणार घोरपडी मधील वाहतूक कोंडी!

| आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयत्नांना यश

 

Ghorpadi Flyover – (The Karbhari News Service) – तब्बल ४० वर्षांपासून वाहतुक कोंडीचा सामना करणाऱ्या घोरपडीगाव येथील वाहतूक कोंडीची समस्या अखेर आज सुटणार आहे. महापालिकेकडून घोरपडी गाव येथील पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले जाणार असून पुणे – मिरज मार्गावरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले जाणार आहे. सोलापूर रेल्वे मार्गावरील पुल सेवा रस्त्यासह सुमारे १ किलोमीटर असून मिरज रेल्वे मार्गावरील पुल ७०० मीटर असणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयत्नातून हा पूल उभारण्यात आला आहे.

आमदार होण्या आधी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष असतानाच आमदार कांबळे या दोन्ही पुलासाठी पुढाकार घेताला . तर २०१९ मध्ये या भागाचे आमदार झाल्यानंतर त्यांनी आमदार निधीसह, राज्यशासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला.

४० वर्षाची समस्या सुटली

या दोन्ही रेल्वे मार्गावर उड्डाणपूल व्हावा अशी या भागातील नागरिकांची जवळपास ४० वर्षे जुनी मागणी होती. सोलापूर रेल्वे ट्रॅकवरून दिवसभरात जवळपास १०४ ट्रेन ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी असलेले रेल्वे फाटक हे साधारण पाच तास बंद होते. तर मिरज मार्गावरून सुमारे १०० गाड्या जातात. परिणामी घोरपडी गाव भागात दिवसभर वाहतूक कोंडी होते. हवे कोंडी फोडण्यासाठी दोन्ही पुल महत्वाची भूमिका निभावणार आहेत.

शहरातील तसेच कॅम्प भागातील नागरिकांना मुंढवा-केशवनगर- खराडी या भागात जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता . तसेच गेल्या दोन दशकात मुंढवा, घोरपडी आणि कल्याणीनगरमधील भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढल्याने या नागरिकांना शहरात येताना कोंडीचा सामना करावा लागतो.

तर हे दोन्ही पुल संरक्षण विभागाच्या हद्दीतून जात असल्याने 2016 मध्ये मिरज मार्गासाठी तर मध्येच कॅन्टोन्मेंटची ४ हजार ५६० चौरस मिटर जागाहस्तांतरितासाठी परवानगी दिली होती. तर सोलापूर मार्गावर ७ हजार चौरस फूट जागा हवी होती. मात्र, ही जागा मिळत नसल्याने आमदार कांबळे यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. तर मिरज मार्गावरील पुल छावणी परिषदेच्या जागेतून जात असून या पुलाच्या कामासाठी छावणी परिषदेला जागेचा मोबदला म्हणून १० कोटी रुपये तसेच ३४ घरे महापालिका बांधून देणार आहेत. तर मिरज मार्गावर महापालिका ८ घरे बांधून देणार आहे.

असे आहेत पुल 

पुणे – सोलापूर रेल्वे मार्ग पुल
लांबी – १०१० मीटर
खर्च – ४८.५० कोटी
——–
पुणे – मिरज रेल्वे मार्ग पुल
लांबी – ६३६ मीटर
खर्च – ४८ कोटी
—-

याप्रसंगी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे,
आमदार सिद्धार्थ शिरोळे,माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी नागरिक उपस्तिथ होते.