General Practitioners Association | जीपीएच्या वतीने आयोजित वीमेन्स काॅन्फरन्स उत्साहात संपन्न  | डाॅ. स्मिता घुले यांचा लेडी जीपी ऑफ द इयर पुरस्काराने गौरव

HomeBreaking Newsपुणे

General Practitioners Association | जीपीएच्या वतीने आयोजित वीमेन्स काॅन्फरन्स उत्साहात संपन्न | डाॅ. स्मिता घुले यांचा लेडी जीपी ऑफ द इयर पुरस्काराने गौरव

Ganesh Kumar Mule May 22, 2023 3:49 PM

Raksha Bandhan | PMPML | रक्षाबंधन निमित्त पीएमपीकडून ज्यादा बसेस चे नियोजन
 Pune Municipal Corporation (PMC) News | आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विविध पदावरील अधिकारी आणि सेवकांची प्रारूप सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द 
PMC Building Devlopment Department | बाणेर बालेवाडी भागातील हॉटेल, पब वर महापालिकेकडून कारवाई 

General Practitioners Association | जीपीएच्या वतीने आयोजित वीमेन्स काॅन्फरन्स उत्साहात संपन्न

| डाॅ. स्मिता घुले यांचा लेडी जीपी ऑफ द इयर पुरस्काराने गौरव

General Practitioners Association | डाॅक्टरांसाठी विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित करणाऱ्या जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या (General Practioners Association) वतीने वीमेन्स काॅन्फरन्स (Women Conference) आयोजित करण्यात करण्यात आली होती. या कार्यक्रमात ‘ लेडी जीपी ऑफ द इयर’ पुरस्काराने डाॅ. स्मिता घुले यांचा गौरव करण्यात आला. सर्वोत्तम वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजसेवा केल्याबद्दल डॉ. घुले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (General Practitioners Association)

जीपीएच्या वतीने आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून पुणे महानगपालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. मनीषा नाईक, तर प्रमुख पाहुण्या म्हणून कांचन पाटील-वडगावकर उपस्थित होत्या. यावेळी जीपीएचे अध्यक्ष डाॅ. श्रीराम जोशी, सचिव डाॅ. भाग्यश्री मुणोत-मेहता, खजिनदार डाॅ. सुनील भुजबळ, माजी अध्यक्ष डाॅ. हरिभाऊ सोनवणे, प्रियदर्शिनी विंगच्या चेअरमन डाॅ. आरती शहाडे व इतर महिला डाॅक्टर उपस्थित होत्या. (Pune News)

डाॅ. श्रीराम जोशी यांनी जीपीएच्या विभिन्न कार्याची माहिती यावेळी दिली. महिला डाॅक्टर आपल्या घराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून वैद्यकीय सेवा करीत असतात. तसेच सामाजिक कार्यातदेखील असतात. अशा वेळी महिला डाॅक्टरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डाॅ. स्मिता घुले यांनी जीपीएच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली व त्यांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले. जीपीए डाॅक्टरासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. प्रमुख अतिथी असलेल्या डाॅ. मनीषा नाईक यांनी एक अधिकारी म्हणून आपण सातत्याने डाॅक्टरांना सहकार्य करीत राहू, असे आश्वासन दिले. या पुरस्कार सोहळ्यापूर्वी विविध तज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञ डाॅक्टरांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. भाग्यश्री मुणोत-मेहता यांनी केले. तर आभार डॉ. राजेश दोषी यांनी मानले.


News Title | General Practitioners Association | The Women’s Conference organized by GPA was full of enthusiasm Dr. Smita Ghule felicitated with Lady GP of the Year Award