GB Syndrome | GBS आजारासंदर्भात महत्वाचे निर्णय | जाणून घ्या काय घेतले निर्णय!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ अर्थात जीबीएस (GBS) या आजाराच्या रुग्णांची पुणे शहरातील वाढती संख्या लक्षात घेता काही महत्त्वाचे निर्णय महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांच्याशी चर्चा करून घेतले आहेत. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
हे घेतले निर्णय
१) पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत.
२) खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ‘शहरी गरीब’ योजनेचा लाभ देऊन पुणे महापालिकेच्या वतीने २ लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय आर्थिक मदत केली जाणार आहे.
३) कमला नेहरु रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन महापालिका मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
COMMENTS