Ganesh Bidkar | गणेश बीडकर यांचे गटनेते पदासाठी नाव निश्चित!  | पुढील कार्यवाही करण्याचे प्रदेश अध्यक्षांचे आदेश 

HomeBreaking News

Ganesh Bidkar | गणेश बीडकर यांचे गटनेते पदासाठी नाव निश्चित!  | पुढील कार्यवाही करण्याचे प्रदेश अध्यक्षांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Jan 30, 2026 7:52 PM

Standing Committee : २ हजार कोटी पेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांना स्थायीची मान्यता!  : ‘हम वादे नही इरादे लेकर आये है’
Ganesh Bidkar : PMC election : पुणेकर प्रशांत जगताप यांना जागा दाखवतील : सभागृह नेते गणेश बिडकर
TP Scheme : PMC GB : टीपी स्किमचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता 

Ganesh Bidkar | गणेश बीडकर यांचे गटनेते पदासाठी नाव निश्चित  | पुढील कार्यवाही करण्याचे प्रदेश अध्यक्षांचे आदेश

 

Pune BJP – (The Karbhari News Service) – भाजप कडून पुणे महापालिका भाजप गटनेते पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. याबाबत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहर अध्यक्ष यांना कळवले आहे. तसेच पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये  भारतीय जनता पार्टीचे एकूण ११९ नगरसेवक निवडून आलेले आहेत. या सर्व नगरसेवकांची २७ रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये  नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी गटास एकत्रित मान्यता देऊन ठराव एकमताने मंजूर केलेला आहे. तसेच या ११९ नगरसेवकांचा ‘पुणे महानगरपालिका भारतीय जनता पार्टी गट’ अशा प्रकारचा गट स्थापन करण्याबाबत देखील ठराव मंजूर करण्यात आला आहे.

तसेच प्रभाग क्र.२४-ड मधून निवडून आलेले नगरसेवक  गणेश मधुकर बीडकर यांची गटनेते पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्याप्रमाणे  गटाचे म विभागीय आयुक्त, पुणे, व आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचेकडे नोंदणी करण्याबाबत ठरविण्यात आलेले आहे.  त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात यावी. असे चव्हाण यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

पुणे महापालिका गटनेते पदी गणेश बिडकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. याबाबत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सूचित केले आहे. तसेच पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या म्हणजे शनिवारी सकाळी आम्ही विभागीय कार्यालयात जाऊन गट आणि गटनेते पदाची रीतसर नोंदणी करणार आहोत.

| धीरज घाटे, शहर अध्यक्ष, भाजप. 

 

भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवून पुणे महानगरपालिकेच्या गटनेता पदी नियुक्ती केल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन. माझ्या राजकीय जडणघडणीत वाटा असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दुःखद निधनामुळे आपण सर्वजण शोकाकुल आहोत. त्यामुळे माझी सर्व कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना कळकळीची विनंती आहे की या निवडीबद्दल कोणताही जल्लोष किंवा उत्साह साजरा करू नये. हीच माझी आणि आपल्या सर्वांची अजितदादांना खरी आदरांजली ठरेल!

| गणेश बिडकर, नगरसेवक, पुणे मनपा

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: