G 20 Summit in Pune | पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रदर्शनाला पाच लाख पुणेकर भेट देणार

HomeBreaking Newsपुणे

G 20 Summit in Pune | पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रदर्शनाला पाच लाख पुणेकर भेट देणार

Ganesh Kumar Mule Jun 16, 2023 3:59 PM

G20 Summit in Pune |  Sinhagad Fort |  Foreign guests of the G 20 conference will visit Sinhagad Fort!
Economic recession | देशात जूननंतर आर्थिक मंदी येऊ शकते
Pandharpur Aashadhi wari | G 20 summit pune | जी-२० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार आषाढी वारी 

G 20 Summit in Pune | पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रदर्शनाला पाच लाख पुणेकर भेट देणार | राजेश पांडे

G 20 Summit in Pune | जी 20 परिषदेच्या (G 20 Summit 2023)  निमित्ताने पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव स्टेडियम (Khashaba Jadhav stedium) मध्ये दिनांक 17 ते 22 जून या कालावधीत ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला पाच लाख पुणेकर भेट देतील असे नियोजन केले असल्याची माहिती जी २० परिषद संयोजन समितीचे समन्वयक राजेश पांडे (Rajesh Pande)  यांनी दिली. (G 20 Summit in Pune)

पांडे म्हणाले, ‘तीन ते नऊ वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिक्षण पद्धती व त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन शैक्षणिक साधनांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांचे कुतूहल जागृत करणारी साधने प्रदर्शनात पाहायला मिळतील. या साधनांमुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी कृतियुक्त शिक्षण देता येईल. ज्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोठा हातभार लागेल. त्यामुळे पुणेकरांनी ही संधी दवडू नये. (G 20 Summit News)

पुणेकरांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी याचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सर्व शैक्षणिक संस्थांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, व्यवस्थापन समिती सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. आदित्य अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनाला अधिकाधिक पुणेकरांनी भेट द्यावी असे आवाहन पाटील यांनी या बैठकीत केले होते. त्याला सर्व शिक्षण संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांतील सुमारे दीड लाख विद्यार्थी आणि शिक्षक प्रदर्शनाला भेट देणार आहेत. पीएमपीएमएलने त्यासाठी विनामूल्य वाहन व्यवस्था केली आहे.’ (G 20 Summit in Pune news)

प्रदर्शनात शंभरहून अधिक शिक्षण संस्था आणि उत्पादकांची दालने असणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ६ ही प्रदर्शनाची वेळ आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. पुणेकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


News Title | G20 Summit in Pune | Five lakh Punekar to visit Basic Literacy and Numeracy Exhibition | Rajesh Pandey