G 20 Delegates | Palkhi Sohala | जी-२० प्रतिनिधींनी  अनुभवला पालखी सोहळा

HomeBreaking Newsपुणे

G 20 Delegates | Palkhi Sohala | जी-२० प्रतिनिधींनी अनुभवला पालखी सोहळा

Ganesh Kumar Mule Jun 12, 2023 4:10 PM

G 20 Summit in Pune | जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठक | पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांची दिली गेली माहिती 
Aga Khan Palace | G20 in Pune | जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट
G 20 Delegates in Pune | महाराष्ट्राच्या लोकनृत्यांनी परदेशी पाहुण्यांना दिला निखळ आनंद

G 20 Delegates | Palkhi Sohala | जी-२० प्रतिनिधींनी  अनुभवला पालखी सोहळा

G 20 Delegates | Palkhi Sohala | जी-२० ‘डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट’ (Digital Economy Working Group) बैठकीसाठी पुण्यात उपस्थित देश विदेशातील प्रतिनिधींनी (G 20 Delegates) पालखी सोहळ्याला (Palkhi Sohala) हजेरी लावत ‘याची देही याची डोळा’ महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवली. यावेळी काही प्रतिनिधींनी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) मनोभावे दर्शन घेतले. (G 20 Delegates | Palkhi Sohala)
पालकमंत्री चंदकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज पादुका मंदिरजवळ फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी-२० प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी मंडप उभारून प्रशासनाच्या आणि पुणे महानगर पालिकेच्यावतीने (Pune Municipal Corporation) व्यवस्था करण्यात आली होती. पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr Rajesh Deshmukh), पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक (ACP Sandeep Karnik) , मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakne) आदी उपस्थित होते. (G 20 Summit in Pune)
प्रारंभी ढोल ताशाच्या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे, टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी रस्त्यावरून दिंड्यांचे आगमन होऊ लागले. हाती भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीची रोपे, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणा वादनात, ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषात, अभंग गायनात, फुगडी, नर्तनात दंग वारकरी पाहून प्रतिनिधी वेगळ्याच अनुभवात दंग झाले. यावेळी काही प्रतिनिधींनी वारकऱ्यांकडून कपाळाला टिळा लावून घेतला. (Palkhi Sohala 2023)
ढोल ताशाच्या तालावर काही प्रतिनिधी नर्तनात दंग झाले. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरला. महिला प्रतिनिधींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली. सर्वच जण आपल्या मोबाईलमधून वारीची छायाचित्रे काढून घेण्यात दंग झाले. प्रतिनिधींनी वारकऱ्यांना भारतीय पद्धतीने नमस्कार करत स्वागत केले. तत्पूर्वी केशव शंखनाद पथकाद्वारे करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शंखनादाचा तसेच ढोल पथकाच्या ढोल वादनाने वातावरणात जोश आणला.
*पालकमंत्र्यांसह परदेशी प्रतिनिधींनी घेतले संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन*
यावेळी दिंड्यांच्या शिस्तबद्ध रांगा पुढे सरकत असताना श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पालखीच्या दर्शनासाठी गर्दीतून पुढे जाऊ लागताच काही परदेशी प्रतिनिधीही पालखीच्या दर्शनासाठी सरसावले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील आणि जी- २० प्रतिनिधींनी भक्तीभावाने पालखीचे दर्शन घेतले.
——
News Title | G 20 Representative |  Palkhi Sohala |  Palkhi ceremony experienced by G-20 delegates