फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती
पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी
रासने म्हणाले, ‘या दोन्ही गावांतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सन २०१७ पासून तुकाई टेकडी फुरसुंगी येथे ३३ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प, या प्रकल्पाला पाणीपुरवठा करणारी लष्कर जलकेंद्रापासूनची मुख्य जलवाहिनी, अंतर्गत वितरण नलिका, तेरा साठवण टाक्या आदी विकासकामे सुरू आहेत. या गावांचा नुकताच महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्याने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहेत. या ठिकाणची पाणीपुरवठ्याची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली.’
COMMENTS