महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
: आरोग्य विभागाचा पुढाकार
: 21 जानेवारी पर्यंत माहिती द्यावी लागणार
डॉ भारती यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार ई हेल्थ सिस्टीम टेक्नॉलॉजिस्ट एल.एल.पी. यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) यांचेकडे दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी , पुणे महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी संस्थेमार्फत करून देण्यात येईल असे नमूद केले आहे. त्यास अनुसरून मा अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी ई हेल्थ सिस्टीम टेक्नॉलॉजिस्ट एल. एल.पी. यांच्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांची मोफत तपासणी करून घेणेस सहमती दर्शविली आहे. सदर तपासण्यांमध्ये के.एफ.टी, एल.एफ.टी, लिपिड प्रोफाईल,इलेक्ट्रोलाईट्स,हिमॅ
ज्या अधिकारी/कर्मचारी यांना ऐच्छिक मोफत तपासणी करून घ्यावयाची आहे त्यांनी आपली नांवे खातेप्रमुखांमार्फत एकत्रित यादी आरोग्य विभागाकडे खालील तक्यानुसार दिनांक २१ जानेवारी २०२२ पर्यंत सादर करावी. तसेच त्याची सॉप्ट कॉपी health@punecorporation.org या ई-मेलवर पाठविण्यात यावी. असे परिपत्रकात म्हटले आहे.
COMMENTS