चार रस्त्यांचा होणार प्राधान्याने विकास | G 20 च्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस
पुणे | महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या विकासावर चांगलेच लक्ष दिले आहे. येत्या काळात शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांचा टप्प्या टप्प्याने विकास केला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सोलापूर, नगर रोड, मगरपट्टा, राजभवन रोड या रस्त्यांना प्राथमिकता दिली जाणार आहे. G 20 च्या धर्तीवर या रस्त्याची दुरुस्ती आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
शहरात नुकतीच G 20 परिषद झाली. यामध्ये वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधि सामील झाले आहे. शहरांचा पायाभूत विकास ही संकल्पना यामागे होती. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून थोड्या अवधीत शहर चकाचक केले होते. यामध्ये रस्त्यांचा चांगल्या पद्धतीने विकास केला होता. त्याच धर्तीवर आता शहरातील महत्वाचे रस्ते विकसित केले जाणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात सोलापूर, नगर रोड, मगरपट्टा, राजभवन रोड या रस्त्यांना प्राथमिकता दिली जाणार आहे. असे दांडगे यांनी सांगितले. यामध्ये बॅरीगेड्स आधुनिक पद्धतीचे लावले जाणार आहेत. जेणेकरून रस्ता चांगला दिसेल. तसेच फुटपाथ, सायकल ट्रॅक व्यवस्थित केले जाणार आहेत. ही सर्व सुशोभीकरणाची कामे G 20 च्या धर्तीवर केली जाणार आहेत. इतर खात्याबरोबर बैठक घेऊन priority ने कामे करावी लागणार आहेत. असेही दांडगे म्हणाले.