Sunil Gogle | Congress | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांचा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत  काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

HomeपुणेBreaking News

Sunil Gogle | Congress | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांचा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

Ganesh Kumar Mule Dec 18, 2022 3:09 PM

Balasaheb Thorat on BJP | धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपाचा मुख्य फंडा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात | लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
Aba Bagul Pune Loksabha | आबा बागुल यांची नाराजी दूर होईल | बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat : Congress : काँग्रेसने उभारली महागाईची गुढी : बाळासाहेब थोरात म्हणाले, महागाई लादणाऱ्या मोदी सरकारने राजीनामा द्यावा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांचा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

पुणे महानगरपालिकेत वर्ष 2007/ 2012 राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील गोगले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या उपस्थिती विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे

यावेळी गोगले म्हणाले, ‘आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहन जोशी , रमेश बागवे यांच्याशी संपर्क झाला माझ्यावर विश्वास दाखवून मला कॉंग्रेस पक्षात येण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच भाजपच्या शासन काळातील वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकन्यांवरील अत्याचार, समाजा समाजातील कटुता, संविधानाला निर्माण झालेला धोका, राष्ट्रीय असुरक्षितता, शोषित, दलीत, महिला,अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय इ. अनेक समस्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय नेते सन्माननीयश्री राहुलजी गांधी यांच्या ऐतिहासिक ” भारत जोडो यात्रा” मुळे मी आत्यंतिक प्रभावित झालो आणि काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

काँग्रेस पक्षाचा एक सैनिक म्हणून आपण जी जबाबदारी माझ्यावर सोपवाल ती प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करीन व पक्षाच्या ध्येय धोरणांना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे योजले आहे