सर्व सामान्य महिलांसाठी मोदी हे विकास पुरुष नसून विनाश पुरुष : अभय छाजेड
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या सूचनेनुसार पंडित नेहरू स्टेडियम ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दांडेकर पूल चौक येथे ‘ महागाई जुमला आंदोलन ‘ घेण्यात आले.
यावेळी बोलताना कमलताई व्यवहारे म्हणाल्या ” मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारला आहे. महिलांच्या डोळ्यातून महागाईचे अश्रू वाहत असून महिलांसाठी मोदी हे महागाईचे प्रतीक झाले असून अनेक ठिकाणी महिला रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा व भाजपा सरकारचा धिक्कार करीत आहेत.”
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यावेळी म्हणाले ” केंद्रातील भाजपा प्रणित सरकारमधील सर्वेसर्वा असलेले नरेंद्र मोदी हे हुकूमशहा प्रमाणे काम करीत असून केवळ जुमलेबाजी करणारे प्रचार मंत्री म्हणून काम बघत आहेत. नोटबंदी सारख्या देशाला मागं येणाऱ्या घोषणेनंतर जीएसटी ची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी तसेच निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये खोटी आश्वासने देणे , देशातील प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका असताना संपूर्ण देशामध्ये पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ न करता निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर घरगुती गॅस दर पेट्रोल डिझेल खाद्यतेल सर्व जीवनावश्यक वस्तू मध्ये वाढ करणे अशा प्रकारे मोदी सरकारने सर्वसामान्यांना देशोधडीला लावले असून मोदी हे विकास पुरुष नसून सर्वसामान्यांसाठी व महिलांसाठी विनाश पुरुष झाले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणाऱ्या या केंद्रातील मोदी सरकारचा मी जाहीर निषेध करतो.”
सदर आंदोलनामध्ये पं. नेहरू ब्लॉक कांग्रेसचे अध्यक्ष सचिन आडेकर , द स पोळेकर , सौ अनिता अनिल धिमधिमे , रोहिणी मल्हाव , स्वाती शिंदे , पपीता सोनवणे सोनिया ओव्हाळ , किरण मात्रे , अविनाश खंडारे , अविनाश अडसूळ , राजाभाऊ नकाते , किरण सोमवंशी , विजय घोलप , अमित काळे , अजय खुडे, दिलीप लोळगे उपस्थित होते.
COMMENTS