Pune Shivsena : Sinhgadh Road bridge : भविष्यातील वाहतूकींचे नियोजन करुनच उड्डणपूलाचे बांधकाम करावे – शिवसेना

HomeBreaking Newsपुणे

Pune Shivsena : Sinhgadh Road bridge : भविष्यातील वाहतूकींचे नियोजन करुनच उड्डणपूलाचे बांधकाम करावे – शिवसेना

Ganesh Kumar Mule Jan 08, 2022 3:12 PM

Marathon : PMC : मॅरेथॉन च्या पारितोषिकांसाठी 35 लाख देणार महापालिका! 
GB Meeting : Ganesh Bidkar vs Mahavikas Aghadi : भाजपने शहरात केलेल्या जाहिरातीवर महापुरुषाचे फोटो नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित विरोधी नेत्यांचे चे मुख्य सभेत आंदोलन : तर गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षाची बोलती केली बंद; म्हणाले हे आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी
PMPML | 7th pay Commission | पीएमपी कर्मचारी वेतन आयोग | दोन्ही महापालिका आणि पीएमपी प्रशासनाचे एकमेकांकडे बोट 

भविष्यातील वाहतूकींचे नियोजन करुनच उड्डणपूलाचे बांधकाम करावे – शिवसेना

पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन

पुणे – सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून अजूनही पर्यायी मार्गांची कामे पूर्ण होवू शकली नाहीत. त्यामुळे पर्यायी मार्गाची कामे आधी पूर्ण करून नंतरच उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात करावी, या मागणीसाठी शिवसेना शहरच्या वतीने संतोष हॉल येथे निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले. शिवसेना खडकवासला विधानसभा मतदार संघाचे समन्वयक मनीष जगदाळे यांनी या आंदोलनाला पुढाकार घेतला. तसेच शहर शिवसेना यांच्या वतीने प्रकल्प मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, शहरातील बहुतांश उड्डाणपुलांचा आराखडा हा चुकीचाच असल्याचा प्रत्यय वाहनचालकांना येतो आहे. वाहतूक नियोजनकारांना एक तर आराखडा तयार करता येत नाही किंवा तयार करण्यात आलेल्या आराखड्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून बदल करण्यात असल्याने शहरातील उड्डाणपुलांमुळे वाहतूककोंडी वाढल्याचेच चित्र आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर मेट्रो आणि इतर वाहतूक व्यवस्थेचा विचार करून पुढील किमान ५०-१०० वर्षाचा विचार करून उड्डाणपूल तयार करण्यात यावा या मगणीसाठी आंदोलन करण्यात आले.

गजानन थरकुडे म्हणाले की, भविष्यातील आव्हानांचा विचार करून उड्डाणपुलाचे नियोजन करणे अपेक्षित असताना, पालिका प्रशासन यांच्याकडून याबाबत कोणतेही नियोजन ना करता काम सुरू करण्यात आले आहे. पर्यायी रस्ते अजूनही रखडले असून त्यावरून वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे आधी पर्यायी रस्ता करा, मगच उड्डाणपुलाचे काम सुरू करा, अशी मागणी आम्ही करत आहोत.

शिवसेना खडकवासला समन्वयक मनीष जगदाळे म्हणाले, पुणे महापालिकेकडून सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत उड्डाणपूलाचे काम चालू करण्यात येणार आहे. या कामामुळे सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिंहगड रस्त्यास पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण करुन हा रस्ता वाहतूकीस खुला करावा. रस्ता वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत उड्डाणपूलाचे काम सुरु करुन नये, अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे.

यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे,  मनिष जगदाळे, उपजिल्हाप्रमुख महेश मते, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, शाखाप्रमुख रमेश देसाई, संघटक प्रसाद गिजरे, समन्वयक राजाभाऊ चव्हाण, विभागप्रमुख महेश पोकळे, वैभव हनमघर, सतीश पंधारे, अनंत घरत, राजू पायगुडे, कल्पेश वाजे, सुनील जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0