Adhunik Lahuji sena : Nagina Kamble : मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई : नगीना सोमनाथ कांबळे

HomeBreaking Newsपुणे

Adhunik Lahuji sena : Nagina Kamble : मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई : नगीना सोमनाथ कांबळे

Ganesh Kumar Mule Nov 15, 2021 8:07 AM

Sadhu Vaswani Flyover | PMC Pune | साधू वासवानी उड्डाणपूल 6 जानेवारी पासून वाहतुकीसाठी राहणार बंद!
How to find peace in the most chaotic and frenzied situations? | 4 proven ways.
Finally, action was taken on the controversial hoarding erected in front of the Pune Municipal Corporation (PMC)!

मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई

आधुनिक लहूजी सेनेच्या संस्थापक अध्यक्ष नगीना सोमनाथ कांबळे यांचा नारा

पुणे : मातंग समाजावर अन्याय आणि अत्याचार होण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. मात्र शांत बसून चालणार नाही. मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई करणार. शिवाय अशा अत्याचाराला पायबंद घालणार, असा नारा आधुनिक लहूजी सेनेच्या संस्थापक  अध्यक्ष नगीना सोमनाथ कांबळे दिला आहे.

14 नोव्हेंबर रोजी पुणे येथे आद्यक्रांतीगुरु लहुजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी  राज्य सचिव भावेश  कसबे, राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर, राज्य सदस्य संभाजी  कांबळे, मराठवाडा अध्यक्ष संतोष  तुपसुंदर, बाळासाहेब गवळी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

नगीना ताई पुढे म्हणाल्या,  लहुजी वस्ताद यांचे संगमवाडी पुणे येथे राष्ट्रीय स्मारक होणेसाठी शासना कडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी देखील झाली आहे.  शिवाय अ ब क ड श्रेणी प्रमाणे आरक्षण वर्गिकरण करण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.  नगीनाताई पुढे म्हणाल्या, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. या मागणीसाठी देखील आता जोर लावला जाणार आहे. अशा या सर्व मागण्या घेवुन राज्यभर काम करणार, असे आश्वासन देखील नगीना ताई यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.

: सफाई कर्मचारी आयोगावर मातंग समाजाचा प्रतिनिधी घेण्यात यावा : भावेश कसबे

सेनेचे राज्य सचिव भावेश कसबे यांनी मागणी केली कि सफाई कर्मचारी आयोगावर मातंग समाजाचा प्रतिनिधी घेण्यात यावा. जेणेकरून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये समाजातील तरुणांना नोकरी देण्यासाठी अडचण येणार नाही. त्या निमित्ताने सर्व सामान्य लोकांना नियमांची माहिती होईल. त्यामुळे समाजाचा विकास होण्यास हातभार लागेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0