Emotional post by Vasant More : भितीने पोटात गोळा आला होता : वसंत मोरे यांची भावनिक पोस्ट 

HomeपुणेBreaking News

Emotional post by Vasant More : भितीने पोटात गोळा आला होता : वसंत मोरे यांची भावनिक पोस्ट 

Ganesh Kumar Mule Apr 11, 2022 3:42 PM

Bharat Itihas Sanshodhak Mandal | Raj Thackeray | भारत इतिहास संशोधक मंडळास राज ठाकरे यांनी भेट दिली बाबरी मशिदीची वीट 
Ajit Pawar Vs Raj Thackeray : अजित पवार राज ठाकरेंवर संतापले : म्हणाले, मुलाखत घेतली तेव्हा …! 
Maharashtra Navnirman Vidyarthi Sena | MNVS | बी.एम.सी.सी येथे मनविसे शाखेचे भव्य दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न

 भितीने पोटात गोळा आला होता

: वसंत मोरे यांची भावनिक पोस्ट

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी केलेल्या मशिदीवरील भोंग्याच्या वक्तव्यावरुन वाद पेटला होता. या वक्तव्यावर पुण्याचे मनसे अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना पुण्याच्या मनसे शहराध्यक्ष पदावरुन काढण्यात आलं होत. त्यानंतर त्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली आहे. भेटीनंतर त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.आज सकाळी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज यांच्या भेटीच्या अगोदर त्यांनी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी सगळ्या पक्षांच्या ऑफर येथे संपलेल्या आहेत असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आता आपल्या फेसबुकवरुन एक भावनिक पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “आयुष्यात खूप पदे मिळाली, ती कामाच्या आणि एकनिष्ठेच्या जोरावर.. पद काय आज आहे तर उद्या नाही हो… पण माझं जे “माझा वसंत” हे स्थान काही काळासाठी डळमळीत झालं होतं, ते तिथं (शिवतीर्थावर) गेल्यावर कळलं की मी तर काहीच हरवलेलं नाही.” असं म्हणत त्यांनी आपली कृतज्ञता आणि पक्षांबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. पुढं ते लिहितात की, उगाचंच भितीने पोटात गोळा आला होता म्हणूनच मी म्हणतो मी आपला इथंच बरा…

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0