MNS : आयुष्यात संघर्षाचा वनवास … वसंत मोरे म्हणाले …!

HomeपुणेBreaking News

MNS : आयुष्यात संघर्षाचा वनवास … वसंत मोरे म्हणाले …!

Ganesh Kumar Mule Apr 11, 2022 8:35 AM

Raj Thackeray | अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे? | मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे? 
Raj Thackeray on Pune Rain | राज ठाकरे यांनी जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा 
Raj Thackeray Pune Rally | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी  सभा

आयुष्यात संघर्षाचा वनवास … वसंत मोरे म्हणाले …!

एका आठवड्याच्या नाराजीनंतर अखेर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेच्या भोंग्यांविरोधातील भूमिकेला दुजोरा न दिल्याने मोरे यांची पदावरून हकालपट्टी झाली होती. यानंतर साईनाथ बाबर यांच्याकडे मनसेने पुण्याची सूत्र दिली. अखेर वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता त्यांची नाराजी दूर झाल्याचं कळतंय. (Vasant More Meets Raj Thackeray in Mumbai)ठाण्यातील सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत, असं मोरे म्हणाले. राज साहेबांच्या भेटीवर मी १०० टक्के समाधानी आहे, असं त्यांनी सांगितलं. उद्याच्या सभेला ये, असं साहेब म्हणाल्याचं मोरेंनी माध्यमांना सांगितलं. मी पहिल्यापासून सांगत होतो कि मी मनसेत राहणार आहे. उद्याची उत्तर सभा आहे. त्या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत, असे मोरे म्हणाले. (Vasant More News)

 
दरम्यान वसंत मोरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, मी माझ्या साहेबांसोबत…

आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…!जय श्रीराम

आज पुण्याचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. मात्र, वसंत मोरे यांनी सर्वात आधी शर्मिला ठाकरेंची भेट घेतली. यानंतर ते राज ठाकरेंच्या भेटीला गेले. यामध्ये खलबतं झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना ‘सगळ्या ऑफर संपल्या’ असं सांगितलं.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेवर उघड उघड नाराजी व्यक्त केल्याने त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं. यादरम्यान, मोरेंना अनेक मोठ्या पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली. मात्र वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना भेटल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केलं. यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली आणि अखेर दोघांची मुंबईत भेट झाली.