Aditya Thackeray | शहराच्या विकासासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून मनपा आयुक्तांना उपयुक्त सूचना  | आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

HomeBreaking Newsपुणे

Aditya Thackeray | शहराच्या विकासासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून मनपा आयुक्तांना उपयुक्त सूचना | आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

Ganesh Kumar Mule Oct 28, 2022 12:55 PM

Raj Thackeray | अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे? | मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे? 
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे घेणार शिवसेना नेत्यांची बैठक  : पुणे महापालिका निवडणुकीची तयारी 
Aditya Thackeray visited Vetal Tekadi | वेताळ टेकडीचा बळी देण्याचा पुणे महापालिकेचा घाट  | आदित्य ठाकरे यांचा आरोप 
शहराच्या विकासासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून मनपा आयुक्तांना उपयुक्त सूचना
| आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद
पुणे | पुणे शहरातील पर्यावरण, ई-बस, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था,पावसाळी पाण्याचे नियोजन, ई-बाईक, रस्ते, फूटपाथ, सायकल ट्रॅक या प्रश्नांबाबत चर्चा केली व पुणे शहराच्या विकासासाठी माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला काही उपयुक्त अशा सूचना केल्या. आयुक्त विक्रम कुमार यांनी या सूचनांसाठी सकारात्मक असा प्रतिसाद दिला. अशी माहिती शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिली.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये पुणे महानगरपालिकेला पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरचा *सी-४०* पुरस्कार मिळाल्याबद्दल आयुक्त यांचे अभिनंदन केले. पर्यावरणाशी निगडीत कामांना चालना व गती आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री असताना दिलेली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी पुणे शहराला मिळालेल्या या पुरस्कारासाठी खास अभिनंदन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत आले होते.

या वेळेस शिवसेनेचे पुणे शहर व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार.मा.सचिनभाऊ अहिर ,शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज शशिकांत सुतार, शहरप्रमुख – गजानन थरकुडे, शहरप्रमुख – संजय मोरे, पुणे उपशहर प्रमुख – आनंद रामनिवास गोयल, युवासेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे, मा.आमदार.चंद्रकांत मोकाटे हे उपस्थित होते.