सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक | अजित पवार
| राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोमीनपुरा येथे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले सदर प्रसंगी मुस्लिम समाजातील नागरिकांची अत्यंत मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.
अजितदादा पवार यांनी रोजे ठेवणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी बोलताना ते म्हणाले या पवित्र महिन्यामध्ये सर्वांनाच सुख-समृद्धी प्राप्त व्हावी तसेच समाजात शांतता प्रस्थापित करण्याकरिता तसेच देशातील सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्याकरता आपण सर्वांनीच एकत्र येऊन या पुढील काळात निश्चित प्रयत्न करायला हवेत रोजा ठेवणाऱ्या सर्व बांधवांना आत्मिक बळ प्राप्त व्हावे हीच आपण प्रार्थना करूयात.
सदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,खा. वंदना चव्हाण , सह पोलिस आयुक्त संदीप कर्णीक , पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल , जयदेव गायकवाड अंकुश काकडे प्रदीप देशमुख , इकबाल शेख समीर शेख, इकराम ख़ान इम्तियाज़ तांबोळी, यूसुफ़ शेख़,जिमी पटेल गणेश कल्याणकर , मौलाना काजमी
ह भ प गणेश ठकार , भंते हर्षवर्धन शाक्य ,ग्यानी प्रताप सिंह , व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते