ECI | RVM | घरापासून दूर असलात तरी आपल्या गावात करता येणार मतदान |निवडणूक आयोग आता RVM आणण्याच्या तयारीत

HomeBreaking Newssocial

ECI | RVM | घरापासून दूर असलात तरी आपल्या गावात करता येणार मतदान |निवडणूक आयोग आता RVM आणण्याच्या तयारीत

Ganesh Kumar Mule Dec 29, 2022 3:26 PM

You can cast your vote even without Voter ID Card
Voters Service Portal | मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करुन घेण्याचे आवाहन
Final Voter List | Election Commission of India | अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार

घरापासून दूर असलात तरी आपल्या गावात करता येणार मतदान

|निवडणूक आयोग आता RVM आणण्याच्या तयारीत

भारतातील (India) जवळजवळ एक तृतीयांश प्रौढ जनता मतदान (voting) करत नाही, हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने (Election commission of India) राजकीय पक्षांना नव्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) डेमोसाठी बोलावले आहे. या मशिनमुळे देशातील स्थलांतरितांना त्यांच्या घरापासून दूर असताना देखील मतदान करण्यास मदत होणार आहे. शिवाय मतदान करण्यासाठी वृद्धांचा प्रवास टळणार आहे.

निवडणूक आयोगाकडून रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (RVM) तयार करण्यात आले असून, त्यामुळे ७२ मतदारसंघांची (constituency)मते स्वीकारता येतील. मतदारानुसार हे यंत्र स्विच केले जाते. यामुळे दुर्गम मतदान केंद्रावरून आरव्हीएमच्या माध्यमातून ७२ मतदारसंघांसाठी मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात.

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 67.4% मतदान झाले होते. अर्थात 30 कोटींहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. यावरून निवडणूक आयोग चिंतीत आहे.

दरम्यान आरव्हीएम मशीनचा डेमो १६ जानेवारीला आहे. या वेळी निवडणूक आयोगाची तांत्रिक तज्ज्ञ समितीही उपस्थित राहणार आहे. याशिवाय कायद्यात आवश्यक बदल, प्रशासकीय कार्यपद्धती आणि मतदान पद्धती किंवा तंत्र अशा सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी संबंधित मुद्द्यांवर आयोगाने ३१ जानेवारीपर्यंत लेखी मते मागवली आहेत.