PMC election : Voter list : मतदारांच्या सोयीसाठी  प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार नोंदणी कक्ष स्थापन 

HomeपुणेPMC

PMC election : Voter list : मतदारांच्या सोयीसाठी  प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार नोंदणी कक्ष स्थापन 

Ganesh Kumar Mule Nov 10, 2021 8:00 AM

PMC Website : ward Structure : महापालिकेच्या या संकेतस्थळावर(Website) वर पहा प्रभाग रचना आणि नकाशे
Suggestion : Objection : Ward Structure : प्रभाग रचनेवर आतापर्यंत 17 हरकती दाखल 
Hearing : Objections : Ward Structure : प्रभाग रचना : हरकतींची संख्या जास्त असल्याने आता दोन दिवस सुनावणी

मतदारांच्या सोयीसाठी  प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार नोंदणी कक्ष स्थापन

: महापालिकेने सुरु केली मतदार यादी जनजागृती मोहीम

पुणे :  आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेतर्फे दि. १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये मतदार यादी अद्यावत करणेच्या अनुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याबाबत जनजागृती करणेचीकार्यवाही संयुक्तरित्या जिल्हाधिकारी, पुणे व महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचेतर्फे करण्यात येत आहे.
मतदार यादी अद्यावत करणेच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबतची माहिती पुणे शहरातील नागरिकांना करून देण्यासाठी विविध माध्यमाद्वारे प्रसिद्धी व प्रचार करण्यात येत आहे. मतदारांच्या सोयीसाठी व मार्गदर्शनासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

: पक्ष नेत्यांसोबत घेतली बैठक

यामध्ये गर्दीच्या ठिकाणी पोस्टर्स लावणे, घंटगाइयांवरून संदेश पसरवणे, मनपाच्या सोशल मीडियाद्वारे प्रचार करणे, विविध स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने जनजागृती करणे इ. स्वरुपाची कार्यवाही पुणे मनपातर्फे करण्यात येत आहे. याबाबत अधिक व्यापक प्रसिद्धीसाठी दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ रोजी महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी सर्व राजकीय पक्षांचे पक्षनेते व पक्षप्रमुख यांची बैठक घेतली. या बैठकीस सुनीता वाडेकर (उप महापौर), हेमंत रासने (अध्यक्ष, स्थायी समिती), गणेश बीडकर (सभागृह नेता), दिपाली धुमाळ (विरोधी पक्षनेता), आबा बागूल (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), पृथ्वीराज सुतार (शिवसेना), साईनाथ बाबर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना),  अश्विनी लांडगे (AIMIM), प्रशांत जगताप (राष्ट्रवादी कॉग्रेस), अरविंद शिंदे (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), तसेच सर्व क्षेत्रीय आयुक्त उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये उपआयुक्त (निवडणूक) अजित देशमुख यांनी मतदारयादीमधील नाव नोंदणी व दुरुस्तीबाबतच्या अर्जाची माहिती दिली. नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म नं. 6 वापरावा. स्वत:चे नाव वगळण्यासाठी किंवा इतर व्यक्तीचे नाव मृत्यू झाल्याने / स्थलांतरित झाल्याने वगळण्यासाठी फॉर्म नं. 7 वापरावा. मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती करणेसाठी फॉर्म नं. ८ वापरावा. एकाच मतदारसंघामध्ये पत्या मध्ये दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म नं. ८ अ वापरावा. सदर नोंदणी / दुरुस्ती ही www.nvsp.in या संकेतस्थळावर देखील ऑनलाइन पद्धतीने करता येते. ऑनलाइन प्रक्रिया अधिक सुलभ असून आपल्या अर्जावर झालेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती देखील त्यामध्ये बघता येते तसेच ऑनलाइन मतदार कार्ड डाउनलोड करून घेता येते. मतदारांच्या सोयीसाठी व मार्गदर्शनासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या सर्व कार्यवाहीची माहिती सदर बैठकीमध्ये देण्यात आली. यावेळेस पदाधिकारी यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 4
DISQUS: 0