बाल विकास मंदिर शाळेत पर्यावरण संवर्धन उपक्रम
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी, इ. १ ली च्या विद्यार्थ्यानी कुंडीत रोपं लावून आणली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड यांनी कुंडीतील रोपांचे पूजन केले. यानिमित्ताने इ. २ ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थांनी पर्यावरण संवर्धन या विषयावर सुंदर चित्रे काढली. या उपक्रमाचे व चित्रकला स्पर्धेचे नियोजन सहा. शिक्षिका सौ. शकुंतला आहेरकर व चित्रकला शिक्षिका श्रीमती माधुरी जगताप यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेत दीपपूजन
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत दीप अमावस्या निमित्त दीपपूजन करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यानी विविध प्रकारचे दिवे, फुले पूजनासाठी आणले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड, शिक्षिका, विद्यार्थी यांनी दीपपूजन केले. इ. 3 री तील चि. वेदांत पांडुरंग सूर्यवंशी ह्या विद्यार्थ्याने दीप अमावस्येविषयी माहिती सांगितली. कु. प्रांजल सूर्यकांत खैरनार ह्या विद्यार्थिनीने कथा सांगितली. तसेच , इ.3 री च्या गगन वर्गातील विद्यार्थ्यांनी शुभंकरोती म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख सौ शकुंतला आहेरकर यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.