Film Corporation election | Sharad Lonkar | चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत पहिल्या उमेदवाराची एन्ट्री

HomeपुणेBreaking News

Film Corporation election | Sharad Lonkar | चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत पहिल्या उमेदवाराची एन्ट्री

Ganesh Kumar Mule Sep 26, 2022 10:09 AM

Water Closure | पूर्ण शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार
Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार
Potholes in pune | महापालिकेकडून गेल्या आठवड्याभरात फक्त १०० खड्ड्यांची डागडुजी 

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत पहिल्या उमेदवाराची एन्ट्री

पुणे- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीचा कार्यक्रम धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून येत्या मंगळवारी जाहीर होणार आहे. दोन गटात होणारे आरोप प्रत्यारोप गेली ७ वर्षे होत असून अजूनही त्याच त्याच आरोप प्र्त्यारोपांवर हि निवडणूक लढविली जाते कि काय ? अशी शक्यता दिसत असताना कला प्रसिद्धी विभागातून पुण्यातील पत्रकार आणि सलाम पुणे या संस्थेचे अध्यक्ष शरद लोणकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

याच सोबत त्यांनी संक्षिप्त जाहीरनामाही आज माध्यमांना पाठविला आहे.

यात दिलेल्या विशेष बाबी-

मराठी सिनेसृष्टी आणि सिंगल स्क्रीन थियेटर सह एक्स्ट्रा आर्टिस्ट,तंत्रज्ञ यांना गतवैभव -सुवर्ण काळ लाभावा या साठी अनेक योजना-प्रकल्प राबविण्याची गरज आहे, त्या आपण सादर करून त्याचा पाठपुरावा करणार.ज्यामुळे थियेटर आणि मराठी सिनमापासून दूर चाललेला रसिक पुन्हा उत्सुकतेने गर्दी करू लागेल . आणि एकूणच या व्यवसायातील प्रत्येकाला प्रतिष्ठा ,वैभव लाभू शकेल.
या क्षेत्रात पैसा लावणाऱ्या निर्मात्यापासून ते गरीब तंत्रज्ञा पर्यंत अनेकांची आर्थिक पिळवणूक होते. कोणाला व्यसनाधीन करून तर कोणाला आमिषे दाखवून लुटले जाते .प्रसिद्धी आणि मार्केटिंग च्या नावाखाली होणाऱ्या अमाप फसवणुकीला पायबंद घालणे.

मुंबई,कोल्हापूर ,पुणे या सारख्या ठिकाणी ज्यांची ऐपत नाही अशा सिनेसृष्टीतील गोरगरीब तंत्रज्ञ ,एक्स्ट्रा आर्टिस्ट यांच्या साठी शासकीय मदतीने स्वस्तात गृहप्रकल्पांची उभारणी करणे.
मुंबईतील फिल्म सिटी मध्ये महाराष्ट्रातून कामासाठी येणाऱ्या प्रत्येक फिल्मी कलावंत-कामगारासाठी किमान ४०० जण राहू शकतील असे अत्यल्प दरात वसतिगृह उभारणे.
गेल्या २०१६ साली झालेल्या निवडणुकीत महेश मांजरेकर यांनी ऐन वेळी माघार घेतल्यानंतर शरद लोणकर यांनी रेल्वे इंजिन चिन्हावर अपक्ष म्हणून कला प्रसिद्धी विभागातून निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता . कला प्रसिद्धी वगळता सर्व जागेवर एकाच पॅनेल च्या उमेदवारांचा विजय झाला होता .