Biometric Attendance | PMC Pune | कर्मचाऱ्यांना शिस्त पाळायचीय ; मात्र प्रशासनालाच सुधरायचं नाही 

HomeपुणेBreaking News

Biometric Attendance | PMC Pune | कर्मचाऱ्यांना शिस्त पाळायचीय ; मात्र प्रशासनालाच सुधरायचं नाही 

Ganesh Kumar Mule Dec 28, 2022 6:19 AM

Biometric attendance | बायोमेट्रिक हजेरीबाबत महापालिका प्रशासन पुन्हा गंभीर  | 20 डिसेंबर ची डेडलाईन 
Biometric Attendene | Smart Identity Card | आगामी ८ दिवसांत कर्मचाऱ्यांना स्मार्ट ओळखपत्र उपलब्ध करून दिले जाणार | महापालिका प्रशासनाचा दावा | महापालिकेत बऱ्याच विभागात Biometric मशीन बंद अवस्थेत
Biometric Machine | PMC Pune | बायोमेट्रिक हजेरीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना लावाव्या लागताहेत रांगा |मशीन अचानक बंद पडत असल्याने कर्मचारी त्रस्त

कर्मचाऱ्यांना शिस्त पाळायचीय ; मात्र प्रशासनालाच सुधरायचं नाही

| बायोमेट्रिक मशीन बाबत मनपा प्रशासनाची निष्काळजी

पुणे | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC employees and officers) कार्यालयीन शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून बायोमेट्रिक हजेरी (Biometric attendance) अनिवार्य करण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेत महापालिका कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी करण्यासाठी धावाधाव करताहेत. मात्र ऑफिस ला आल्यांनतर मात्र मशीन काम करताना दिसत नाहीत (Internal server error). त्यामुळे कर्मचारी लवकर येऊनही त्यांची हजेरी लागताना दिसत नाही. हा प्रकार मनपा भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये (ward offices) घडताना दिसत आहे. यामुळे कर्मचारी परेशान झाले आहेत. याबाबत प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जावी, अशी मागणी कर्मचारी करत आहेत. (Pune Municipal corporation)
महापालिका प्रशासनाकडून कार्यालयीन शिस्ती बाबत कडक धोरण अवलंबले आहे. त्याचाच भाग म्हणून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. हजेरी झाली नाही तर वेतन कापण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरपणे घेतली आहे. त्यानुसार महापालिका कर्मचारी वेळेत येऊन बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्याचा प्रयत्न करताहेत. कर्मचाऱ्यांना यासाठी स्मार्ट ओळखपत्र देखील देण्यात आले आहे. मात्र कर्मचारी ऑफिसला आल्यानंतर मात्र थम्ब करताना या मशीन काम करताना दिसत नाहीत. एक तर खूप वेळ वाट पाहावी लागते. वाट पाहूनही मशीन काम करत नाहीत. मशीनवरील Network error किंवा internal server error असे मेसेज पाहून कर्मचारी वैतागले आहेत. मनपा भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये हीच स्थिती आहे. (PMC pune)
एकीकडे प्रशासनाच्या आदेशानुसार कर्मचारी शिस्त पाळण्याबाबत गंभीर आहेत तर महापालिका प्रशासन मात्र निष्काळजी असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील मशीन बाबत काहीच करण्यात आले नाही. महापालिका भवनात फक्त नवीन मशीन बसवलेल्या दिसून येताहेत. मात्र त्या कामाच्या असल्याचे दिसून येत नाही. क्षेत्रीय कार्यालयामध्ये हीच अवस्था आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त पाळायचीय मात्र प्रशासनालाच सुधरायचं नाही. असे म्हटले जात आहे. (Biometric machine)
दरम्यान याबाबत विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी बातचीत होऊ शकली नाही.