New Member Of Standing Committee : PMC : स्थायी समितीच्या नवीन ८ सदस्यांची झाली निवड!

HomeपुणेBreaking News

New Member Of Standing Committee : PMC : स्थायी समितीच्या नवीन ८ सदस्यांची झाली निवड!

Ganesh Kumar Mule Feb 21, 2022 12:40 PM

7th Pay Commission : PMC : अखेर वेतन आयोगानुसार वेतन होण्यास सुरुवात 
आरोग्य प्रमुखांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी! : सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती रद्द करणार का? : नसेल तर आरोग्य प्रमुख आपला कार्यकाळ वाढवून घेणार का? : महापालिका आयुक्त आणि आरोग्य प्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष
Manjusha Nagpure | सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम लवकर सुरु करा  | माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

स्थायी समितीच्या नवीन ८ सदस्यांची झाली निवड

: एनसीपी ने जुन्या दोन अध्यक्षांना दिली संधी

पुणे – महापालिकेच्या (Pune Municipal corporation) स्थायी समितीच्या (Standing Committee) आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या आठ जागांवर सदस्यांची निवड (Selection) करण्यासाठी सोमवारी  खाससभा (Speacial Meeting) आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार नवीन 8  सदस्यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने तर जुन्या दोन अध्यक्षांना संधी दिली आहे. अवघ्या १४ दिवसांसाठी हे सदस्य असणार असल्याने नेमकी यामध्ये कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता वाढली होती. त्यानुसार आता निवड झाली आहे. आता हे सदस्य नवीन अध्यक्ष निवडतील.

स्थायी समितीच्या सदस्यांचा कालावधी दर दोन वर्षांनी संपतो, यामध्ये भाजपचे ४, राष्ट्रवादीचे २, तर कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्यांचा कालावधी २८ फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे, तो त्यापूर्वी आचारसंहिता लागू झाली नाही तर महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होईल. दरम्यान स्थायी समितीच्या ८ सदस्यांची मुदत संपत असताना पुन्हा निवडणूक घेण्याऐवजी त्यांना १४ दिवसांसाठी मुदतवाढ देता येते का ? याचा विचार झाला, पण महापालिकेच्या विधी विभागाने निवडणूक घ्यावी लागेल, असा अभिप्राय दिला आहे.त्यामुळे आता ही निवडणूक घेण्यासाठी २१ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता खास सभा बोलविण्यात आली. १४ दिवसांसाठी पक्षाकडून नव्यांना संधी मिळेल की पुन्हा त्याच नगरसेवकांना संधी देणार, याबाबत उत्सुकता होती.
दरम्यान आता स्थायी समितीचे सर्व सदस्य नवीन अध्यक्ष निवडणार आहेत. त्यासाठी आता नगरसचिव विभागाकडून विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव जाईल. त्यांनी तारीख दिल्यानंतर कार्यक्रम जाहीर होईल आणि निवडणूक होईल.

: या सदस्यांची संपणार मुदत

भाजप  – मानसी देशपांडे, सुनीता गलांडे, वर्षा तापकीर, उज्वला जंगले,
राष्ट्रवादी कॉंग्रेस- नंदा लोणकर, अमृता बाबर
शिवसेना – बाळासाहेब ओसवाल
काँग्रेस  – लता राजगुरू
—–

: हे नवीन निवडले सदस्य

भाजप : मानसी देशपांडे, वर्षा तापकीर, सुनीता गलांडे, उज्वला जंगले
राष्ट्रवादी कॉंग्रेस : विशाल तांबे, अश्विनी कदम
शिवसेना : बाळा ओसवाल
कॉंग्रेस : लता राजगुरू