Eid-ul-Zuha | महापालिका कर्मचाऱ्यांना गुरुवारी सुट्टी! | महापालिकेकडून परिपत्रक जारी
Eid-ul-Zuha | बकरी ईद (ईद उल झुआ) (Eid-ul-Zuha) या सणानिमित्त जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या (Public Holiday) दिनांकात बदल करण्यात आला आहे. ही सुट्टी 28 जून म्हणजे बुधवारी दर्शवण्यात आली होती. मात्र सण 29 ला म्हणजे गुरुवारी येत असल्याने सार्वजनिक सुट्टी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने सुट्टी जाहीर केल्यानंतर महापालिकेने (Pune Municipal Corporation Circular) देखील गुरुवारच्या सुट्टीचे परिपत्रक जारी केले आहे. (Eid-ul-Zuha)
शासनाने सन २०२३ करीता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील बकरी ईद (Bakraid) ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, २८.०६.२०२३ रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र हा सण गुरुवार, २९.०६.२०२३ रोजी येत असल्याने २८.०६.२०२३ रोजीची सुट्टी रद्द करुन गुरुवार, २९.०६.२०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. असे राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले नव्हते. त्यामुळे कर्मचारी संभ्रमात होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून गुरुवारच्या सुट्टीचे परिपत्रक (PMC Circular) जारी केले आहे. (Public Holiday)