Eco Friendly Ganeshotsav 2025 | पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी  मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार किंवा व्यावसायिक यांच्याकडूनच मूर्ती खरेदी करा  | पुणे महापालिकेचे जाहीर आवाहन

Homeadministrative

Eco Friendly Ganeshotsav 2025 | पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी  मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार किंवा व्यावसायिक यांच्याकडूनच मूर्ती खरेदी करा | पुणे महापालिकेचे जाहीर आवाहन

Ganesh Kumar Mule Aug 18, 2025 7:33 PM

Plastic Ban in PMC Offices | प्लास्टिक फाईल्स, प्लास्टिक बॉटल्स, चहाच्या कागदी कपांचा वापर त्वरीत बंद करा | सर्व विभाग, क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ यांना महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे सक्त आदेश  
Transfer of IAS Dr. Kunal Khemnar! | Prithviraj BP is the new Additional Commissioner of Pune Municipal Corporation
Safai Mitra | PMC Pune | सफाई मित्र यांना सुरक्षा साधने व आयुष्यमान कार्डचे वितरण | पुणे महानगरपालिका प्रशासनाचा उपक्रम 

Eco Friendly Ganeshotsav 2025 | पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी  मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार किंवा व्यावसायिक यांच्याकडूनच मूर्ती खरेदी करा

| पुणे महापालिकेचे जाहीर आवाहन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांचेकडून मूर्ती खरेदी करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव- २०२५ साजरा करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन सर्व पुणेकरांना महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS)  यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation -PMC)

उच्च न्यायालयाने  दिलेल्या आदेशानुसार पर्यावरण पूरक सण साजरे करण्याकरिता प्लास्टर ऑफ पॅरीस (पी.ओ.पी.) मूर्ती विसर्जनाबाबतच्या दिनांक २१ जुलै २०२५ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक सुधारणा करून सुधारीत एकत्रित मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदरच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिनांक १२ मे २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेल्या सूचनांमध्ये अधिकच्या स्वरुपात महाराष्ट्र राज्याकरिता समाविष्ट आहेत. सदर मार्गदर्शक सूचना या मार्च, २०२६ पर्यंत साजऱ्या करण्यात येणाऱ्या सर्व सणा / उत्सवाकरिता लागू आहेत.

१) प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) मूर्तीचे उत्पादक व विक्रेते यांनी मूर्ती विक्री करताना मूर्तीच्या मागील बाजूस, स्पष्टपणे दिसेल अशा स्वरुपाचे ऑईल पेंटने लाल रंगाने गोल आकाराचे चिन्ह करणे आवश्यक राहील.

२) प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) मूर्ती बनविणारे मूर्तीकार व मूर्ती विक्रेत्यांना सदर मूर्तीची विक्री करताना याबाबतची नोंदवही ठेवणे बंधनकारक राहील.
३) सार्वजनिक मंडळामार्फत मोठ्या आकाराच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आल्यास सदर मूर्तीच्या ऐवजी विसर्जनासाठी प्रतिकात्मक स्वरुपात लहान मूर्त्यांचा वापर करावा. तसेच प्रतिष्ठापित मोठ्या मूर्तीचा वापर पुढील वर्षी देखील करण्यात यावा.
४) प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) मूर्तीचे उत्पादक व विक्रेते यांनी प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) पासून बनविण्यात येणाऱ्या घरगुती उत्सवांच्या, तसेच सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या इतर सर्व मूर्ती केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित कराव्यात.
५) सार्वजनिक मंडळाच्या सहा फुटापेक्षा जास्त उंचीच्या मुर्तीचे विसर्जन, जर त्यांना विसर्जनासाठी इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तर सदर मुर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करण्याची त्यांना परवानगी असेल.
६) केवळ नैसर्गिक जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल जसे कि, पारंपारिक शाडू माती / चिकणमाती वापरून बनवलेल्या कच्चा मालापासून मूर्ती तयार करणे.
[ कोणताही विषारी अजैविक कच्चा माल तसेच प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी), प्लास्टिक आणि थरमाकोल (पॉलीस्टीरिन) यांचा वापर होणार नाही.]

७) मूर्तीचे दागिने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने रेझीन्सचा चमकदार सामग्री म्हणून वापर केला जाऊ शकतो.
८) मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल पाणी आधारित रंग, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा
[ विषारी आणि नॉन बायो डीग्रेडेबल (अविघटनशील) रासायनिक रंग / ऑईल पेंट्स, इनॅमल आणि कृत्रिम रंगावर आधारित पेंटसच्या वापर करण्यास सक्त मनाई आहे.
९) नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावे. रंगविण्यासाठी फक्त नैसर्गिकरीत्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग (फुले, साल, पुंकेसर, पाने, मुळे, बिया, फळे) खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या रंगाचा वापर करावा.
[ विषारी रसायने असलेली डिसपोजेबल साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.]
१०) विसर्जनापूर्वी इतर निर्माल्य कृत्रिम तलावाशेजारी स्वतंत्रपणे संकलित करून त्यावर पर्यावरण पूरक प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर किंवा पुनर्निमितीसाठी वापर करण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: