E-Content Development Workshop | ओतूरच्या वाघिरे महाविद्यालयात ई-कंटेंट डेव्हलपमेंट कार्यशाळा संपन्न

HomeपुणेEducation

E-Content Development Workshop | ओतूरच्या वाघिरे महाविद्यालयात ई-कंटेंट डेव्हलपमेंट कार्यशाळा संपन्न

Ganesh Kumar Mule Nov 14, 2022 1:16 PM

NSS | Dr Vasant Gawde | एन.एस.एस. व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा | प्रा.डॉ. वसंत गावडे
Organic Farming | lभविष्यात सेंद्रिय शेतीच माणसाला तारणार | योगेश मनसुख | अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयात उभारला गांडूळ खत प्रकल्प
PDEA | ओतूर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

ओतूरच्या वाघिरे महाविद्यालयात ई-कंटेंट डेव्हलपमेंट कार्यशाळा संपन्न

ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वगैरे महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी (IQAC) आणि रुसा( RUSA) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ व १२ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘ई-कन्टेनट डेव्हलपमेंट'(E-CONTENT) कार्यशाळा आयोजित करण्यात आली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे यांनी दिली.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार अध्यापनामध्ये ई कंटेंटचा वापर करणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालयात रूसा अनुदान अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूम (VERTUAL CLASS ROOM) विकसित करण्यात आली आहे. सदर व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून उच्च दर्जाचे ई कंटेंट विकसित केले जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून शाहू मंदिर महाविद्यालय पुणे येथील प्रा डॉ गणेश मधे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेमध्ये इन्स्टा सॉफ्टवेअरच्या मदतीने शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे तसेच ते तयार केलेले व्हिडिओ, पीपीटी, ऑडिओ, पीडीएफ स्वरूपातील माहिती, फोटो इत्यादी घटकांचा वापर करून कॅमटासिया सॉफ्टवेअरच्या मदतीने सर्वांचा एक व्हिडिओ तयार करणे तसेच तयार करण्यात आलेल्या व्हिडिओचे ऑनलाइन यूट्यूब तसेच महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे उपलब्ध करता येतील याविषयीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापकांना देण्यात आले.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या मनोगतामध्ये प्राचार्य डॉअभय खंडागळे यांनी सदर कार्यशाळेची तसेच महाविद्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरूमची गरज स्पष्ट केली व पुढील काळामध्ये महाविद्यालयाच्या वतीने जास्तीत जास्त ई- कंटेंट विकसित केले जावेत असे आवाहन सर्व शिबिरार्थी प्राध्यापकांना केले.

सदर कार्यशाळेमध्ये साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे, उपप्राचार्य. डॉ एस एफ ढाकणे, डॉ. व्ही एम शिंदे, डॉ के डी सोनावणे, रुसा समन्वयक डॉ एस आर गव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ एस आर गव्हाळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ एस एफ ढाकणे यांनी व्यक्त केले.

सदर व्हर्च्युअल क्लासरूमच्या निर्मितीसाठी व ई कन्टेन्ट डेव्हलपमेंट कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री.राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा.ॲड.संदीप कदम, खजिनदार मा.ॲड.मोहनराव देशमुख, उपसचिव मा.श्री एल. एम. पवार, सहसचिव मा. श्री.ए.एम. जाधव यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.