सेवा वाहिन्यांच्या प्रलंबित कामामुळे रस्ता दुरुस्तीचे टेंडर रखडले
| पथ विभागाकडून विभिन्न विभागाशी पत्रव्यवहार
पुणे | महापालिकेच्या पाणी पुरवठा विभाग, विद्युत आणि ड्रेनेज विभागाकडून सेवा वाहिन्याची कामे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम पथ विभागाच्या दुरुस्तीच्या कामावर होत आहे. त्यामुळे पथ विभागाचे दुरुस्तीचे टेंडर देखील रखडले आहेत. त्यामुळे ही कामे करून घेण्याबाबत पथ विभागाने सर्व विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. (PMC pune)
पथ विभागामार्फत पावसाळयात अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांचे पुर्नडांबरीकरण करणेकामी पॅकेज
क्रं. १ ते ६ अन्वये टेंडर मागविण्यात आली आहेत. काही टेंडर्सची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काही
ठिकाणी कामे सुरु करण्यात आली आहेत. ही कामे पथ विभगामार्फत त्वरीत सुरु करुन आगामी पावसाळयापूर्वी कालमर्यादेत पुर्ण करणे आवश्यक आहेत. सदर कामांपूर्वी विविधविभागाशी संबंधित सेवा वाहिन्यांची कामे पूर्ण करणेबाबत यापूर्वीच कळविले होते. परंतू आज अखेर विभागामार्फत सेवा
वाहिन्यांची कामे प्रलंबित असल्यामुळे विषयांकित पॅकेज क्रं. १ ते ६ ची कामे मार्गी लागण्यास अडचण
निर्माण झाली आहे. याबाबत २५ जानेवारी रोजी मा. मुख्य अभियंता (पथ) यांचे दालनात सकाळी १२.०० वाजता बैठक आयोजित केली आहे. (Pune Municipal corporation)