Dr Vasant Gavde | विविध बोली म्हणजे मराठीचा ऐतिहासिक दस्तऐवज – डॉ. वसंत गावडे

Homeadministrative

Dr Vasant Gavde | विविध बोली म्हणजे मराठीचा ऐतिहासिक दस्तऐवज – डॉ. वसंत गावडे

Ganesh Kumar Mule Jan 27, 2026 8:34 PM

Reading Inspiration Day | पुस्तक हे युवकांना ज्ञानाचे ऊर्जा स्रोत पुरविणारे साधन | डॉ वसंत गावडे  | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा 
E-Content Development Workshop | ओतूरच्या वाघिरे महाविद्यालयात ई-कंटेंट डेव्हलपमेंट कार्यशाळा संपन्न
NAAC Committee | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास उद्या नॅक कमिटीची भेट

Dr Vasant Gavde | विविध बोली म्हणजे मराठीचा ऐतिहासिक दस्तऐवज – डॉ. वसंत गावडे

Annasaheb Waghire College – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत मराठी विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने मराठी भाषेशी संबंधित विविध स्पर्धा, उपक्रम व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती प्राचार्य डॉ.रमेश शिरसाट व ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.निलेश हांडे यांनी दिली. (Pune News)

उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश शिरसाट यांच्या शुभहस्ते व उपप्राचार्य डॉ.कल्याण सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. डॉ.निलेश हांडे प्रास्ताविक करताना म्हणाले, “पंधरवड्याचे औचित्य साधून विविध उपक्रम, स्पर्धा, यांचे जे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. विविध स्पर्धांमध्ये प्रथम तीन विद्यार्थी व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना २७ फेब्रुवारी २०२६ रोजी *मराठी भाषा गौरव दिन या समारंभात प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.”

उद्घाटन पर भाषणात डॉ.वसंत गावडे म्हणाले,” *मराठीच्या विविध बोली म्हणजे मराठी भाषेचा ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. अनेक बोली भाषांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे. या बोलीभाषांचे जतन,संवर्धन व संशोधन होणे गरजेचे आहे.मराठी भाषा बोलणाऱ्या प्रत्येक माणसाचे हे कर्तव्य आहे.”अध्यक्षीय भाषणात डॉ.शिरसाट म्हणाले,”मराठी आपली मातृभाषा आहे. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे आपल्या मूळ संकल्पना स्पष्ट करणारे असते. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. ती ज्ञानभाषा व्हायला पाहिजे.”

भाषा पंधरवड्यात पुढील उपक्रम आयोजित करण्यात आले. *स्थानिक-पारंपरिक गीत संकलन, स्व:लिखित काव्य लेखन, काव्यवाचन, बोलीभाषेतील शब्द संकलन,बोली भाषेतील म्हणी संकलन, निबंध लेखन, कथा लेखन, कथा अभिवाचन, घोषवाक्य लेखन, पुस्तक परीक्षण, वक्तृत्व,सुंदर हस्ताक्षर,ऑनलाइन प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा,
व्याख्याने व लेखन कौशल्य कार्यशाळा* अशा भरगच उपक्रमांची मेजवानी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नंदकिशोर उगले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीपान गव्हाळे,आय.क्यू.एसी. समन्वयक डॉ. योगेश्वर काळदंते,डॉ.राहुल पाटील,डॉ.रमेश काशिदे, , प्रा. रोहिदास मेमाणे,डॉ. रोहिणी मदने, प्रा. विद्या कोठावळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कॅडेट पगारे निकिता आणि शेख इम्रान यांनी केले.आभार प्रदर्शन विद्यार्थी सीनियर अंडर ऑफिसर प्रवीण दिघे यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0