Dr. Baba Adhaav | डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची मागणी

HomeBreaking Newsपुणे

Dr. Baba Adhaav | डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची मागणी

Ganesh Kumar Mule Apr 11, 2023 4:12 PM

Pune Municipal Corporation Holiday | मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी बाबत महापालिका आयुक्तांचे आदेश जारी! 
PMPML Income | पीएमपी’ चे ३ ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न ८ कोटी २७ लाख | गणेशोत्सव काळातील उत्पन्न
NCP President Sharad Pawar | माझ्या निर्णयाची कल्पना अजित पवार यांना दिली होती | शरद पवार 

डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची मागणी

| महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन

पुणे : “ महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा.बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा ‘, अशी मागणी पुणे शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केली आहे. आज पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख संजय मोरे,उपप्रमुख डॉ.अमोल देवळेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी समता भूमी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन केले,त्यानंतर ही मागणी केली.यासंदर्भात त्यांनी एक पत्रकही प्रसिद्धीस दिले आहे.गजानन थरकुडे,उत्तम भुजबळ,विशाल धनावडे,पल्लवी जावळे,पृथ्वीराज सुतार,बाळा ओसवाल,अशोक हरणावळ,संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच राष्ट्रवादी च्या एड. रुपाली पाटील-ठोंबरे उपस्थित होत्या .

‘गेली नऊ दशके अव्याहतपणे फुले विचारांची कास धरून सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे डॅा. बाबा आढाव हे खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस आहेत. फुले जयंती प्रसंगी बाबा आढाव यांच्यासारख्या ऋषितुल्य वक्तित्वाचा सन्मान करणे म्हणजे आपला प्रबोधनकारी वारसा जपणे होय.येणाऱ्या महाराष्ट्र दिनी बाबा आढावांचा ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार देऊन सन्मान व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे.या मागणीचा आदर करत सरकारने त्वरित तशी घोषणा करावी आणि समविचारी सर्व लोकांनी या संदर्भात तशी निवेदने माध्यमातून मुख्यमंत्री व सरकारकडे करावी’, असे या पत्रकात म्हटले आहे.

‘सत्यशोधक’ विचारांचा हा वारसा फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अमुल्य असा ठेवा आहे.महापुरूषांच्या प्रतिमेचा-कार्याचा गुणगौरव तर आपण त्यांच्या जन्मदिनी करतोच परंतू त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणे हिच त्यांच्याप्रति खरी कृतज्ञता ठरेल’, असे या पत्रकात म्हटले आहे.