PMC : डॉ रामचंद्र हंकारे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा करणार लेखाजोखा

HomeपुणेBreaking News

PMC : डॉ रामचंद्र हंकारे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा करणार लेखाजोखा

Ganesh Kumar Mule Nov 18, 2021 2:12 AM

Cancer | Ayurveda | कैंसर में प्रतिरक्षा प्रणाली सशक्तिकरण में आयुर्वेद सक्षम
Monkey Pox | घाबरू नका….मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या….खबरदारी बाळगा….
Medical Management and IT Systems | एका क्लिकवर रुग्णाच्या पूर्वीच्या आजाराच्या उपचाराची माहिती मिळणार 

डॉ रामचंद्र हंकारे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा करणार लेखाजोखा

: केंद्र आणि राज्याच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आढावा

पुणे : राज्य आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ रामचंद्र हंकारे गुरुवारी दुपारी 2:30 ते 6 या वेळेत महापालिकेच्या आरोग्य विभागाचा आढावा घेणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आगामी काळात प्रभावीपणे राबवण्यासाठी हा लेखाजोखा होणार असे मानले जात आहे. दरम्यान डॉ हंकारे महापालिकेचे आरोग्य प्रमुख होते. नुकतीच त्यांची बदली झाली होती. त्यांनतर डॉ हंकारे महापालिकेत आढावा घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे या आढावा बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

: लसीकरणाचा देखील होणार आढावा

 राज्यातील आरोग्य सेवेशी संबंधित RMNCH+A, क्षयरोग / कुष्ठरोग, कोविड लसीकरण आणि किटकजन्य आजार या महत्वाच्या कार्यक्रमांचा व इतर सर्व विषयांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने सन २०२१-२२ मध्ये सर्व निर्देशांकाची उद्दिष्टे पुर्ण होण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्राकरीता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून डॉ हंकारे यांची राज्य स्तरावरुन नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत झालेल्या कार्यक्रमांच्या आढाव्यासंबंधात महानगरपालिकेतील आरोग्य सेवेशी संबधित सहाय्यक आरोग्य अधिकारी, शहर क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, आरसीएच ऑफीसर, वैदयकीय अधिक्षक रुग्णालय, सर्व नोडल ऑफीसर, परिमंडळ वैदयकीय अधिकारी, प्रभाग वैदयकीय अधिकारी, निवासी वैदयकीय अधिकारी प्रसुतीगृह, वैदयकीय अधिकारी हेल्थ पोस्ट, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, शहर लेखा व्यवस्थापक व महानगरपालिका स्तरावरील सर्व कार्यक्रम अधिकारी यांना सॉफ्ट व हार्ड कॉपी माहितीसह वेळेवर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. या बैठकीवेळी यापुर्वी झालेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने सर्व अनुपालन व कार्यपुर्ती अहवालाचे सादरीकरण करण्यात यावे, असे ही सांगण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0