Dr Rajendra Bhosale IAS | तर या प्रकरणात खातेप्रमुखांना धरले जाणार व्यक्तीश: जबाबदार! | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचा इशारा 

Homeadministrative

Dr Rajendra Bhosale IAS | तर या प्रकरणात खातेप्रमुखांना धरले जाणार व्यक्तीश: जबाबदार! | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचा इशारा 

Ganesh Kumar Mule Dec 31, 2024 8:34 PM

GB Syndrome Pune PMC | GBS आजारासंदर्भात महत्वाचे निर्णय | जाणून घ्या काय घेतले निर्णय!
Warje Multispeciality Hospital -PMC| वारजे हॉस्पिटलला संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदील |पुणे महापालिकेच्या एक वर्षापासून च्या अथक पाठपुराव्याला यश
Pune Municipal Corporation (PMC) – पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने बांधण्यात आलेल्या स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे लोकार्पण!

Dr Rajendra Bhosale IAS | तर या प्रकरणात खातेप्रमुखांना धरले जाणार व्यक्तीश: जबाबदार! | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचा इशारा

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – फौजदारी गुन्ह्याच्या अनुषंगाने महापालिका कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास खाते प्रमुखांना व्यक्तिशः जबाबदार धरले जाणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्याविरुद्ध काही प्रसंगी पोलीस कारवाई उद्भवून त्यांना पुढील तपासासाठी अटक करण्यात येते. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील ४ (१) (क) नुसार “ज्या बाबतीत त्यांच्याविरुद्ध कोणत्याही फौजदारी गुन्ह्याच्या संबंधात खटल्याचे अन्वेषण, चौकशी किंवा न्यायचौकशी चालू असेल, अशा बाबतीत निलंबनाधिन ठेवू शकेल” नियम ४(२)(अ) नुसार “फौजदारी आरोपाखाली किंवा अन्यथा अटक करून ४८ तासांहून अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन अभिरक्षेमध्ये ठेवले असेल तर त्याला अटकेत ठेवल्याच्या दिनांकापासून निलंबनाधिन ठेवता येते ” अशी तरतूद आहे.

पोलीस कारवाई झाल्यानंतर व त्याबाबत पोलीस यंत्रणेकडून अहवाल प्राप्त होताच संबंधितास अटकेच्या दिनांकापासून तात्काळ निलंबित करण्याची आवश्यकती कार्यवाही ही तत्परतेने होताना दिसून येत नाही. अशी कारवाई होण्यास प्रदीर्घ कालावधी व्यतीत होत असल्याचे आमचे निदर्शनास आले आहे. ही  बाब गंभीर स्वरूपाची आहे. असे महापालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

आयुक्तांनी सर्व खातेप्रमुखांना निर्देशित केले आहे की, या प्रकरणी आपले अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांचे दाखल गुन्हा माहिती तात्काळ DMC (GAD) / ADCOM(G) यांना लेखी द्यावी व त्यांनी वस्तुस्थितीचे निवेदन आयुक्त यांना सादर करून त्यावर शिस्तभंग विषयक आदेश प्राप्त करून घ्यावेत. या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यामध्ये दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित खातेप्रमुखास व्यक्तीशः जबाबदार धरून त्यांचेविरुद्ध आवश्यक ती पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे आयुक्तांनी म्हटले आहे.