Dr Pramod Sawant | लहुजी वस्ताद साळवे स्मारक पूर्ण करण्यासाठी सुनील कांबळे यांना पुन्हा एकदा निवडून द्या – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

HomeBreaking News

Dr Pramod Sawant | लहुजी वस्ताद साळवे स्मारक पूर्ण करण्यासाठी सुनील कांबळे यांना पुन्हा एकदा निवडून द्या – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

Ganesh Kumar Mule Nov 15, 2024 4:21 PM

Ajit Pawar | Ganeshotsav 2023 | राज्यात जोमदार पाऊस पडूदे आणि बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे | अजित पवार यांचे गणपतीकडे मागणे
PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर  | बऱ्याच प्रस्थापित नगरसेवकांना धक्का 
24*7 Water Project | समान पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित वेळेतच पूर्ण करा – पालकमंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला पुणे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत आढावा

Dr Pramod Sawant | लहुजी वस्ताद साळवे स्मारक पूर्ण करण्यासाठी सुनील कांबळे यांना पुन्हा एकदा निवडून द्या – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

 

MLA Sunil Kamble – (The Karbhri News Service) –    महाराष्ट्रात महायुतीसाठी सकारात्मक वातावरण आहे, मला खात्री आहे महाराष्ट्रात महायुतीचेच सारकरा येणार. कोकण, कोल्हापूर असा मी प्रवास करतोय, परत एकदा महायुतीचे डबल इंजिन सरकार आणण्यासाठी लोक महायुतीला मतदान करतील.  गेल्या अडीच वर्षात महायुतीने केलेले काम लोकांसमोर आहेत, पुण्यात विकास कामे महायुतीच्या काळात झाली आहेत, पुणे कॅंटॉन्मेंट मधील आमदार सुनील कांबळे यांनी विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघांचा कायापालट केला, अनेक वर्षे रखडलेले लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला, यामुळे हे स्मारक पूर्ण करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा निवडून द्या असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मतदारांना केले. (Pune Cantonment Assembly Constituency)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि मित्रपक्षाचा कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सुनील कांबळे यांच्या  प्रचारार्थ  डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसागर हॉल येथे महाबैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.  या बैठकीसाठी डॉ. बाळासाहेब हरपाळे (अध्यक्ष वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश),  डॉ. राहुल कुलकर्णी (उपाध्यक्ष वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश), डॉ. गणेश परदेशी (अध्यक्ष वैद्यकीय आघाडी पुणे शहर भाजपा) तसेच कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष, सरचिटणीस,  माजी नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, आज मी खासकरून डॉक्टर्स, इंजिनियर यांना भेटतोय, महायुतीच्या सर्व उमेदवारांबद्दल, महायुतीच्या कामाबद्दल त्यांना माहिती आहे, कॉँग्रेसने 60 वर्षात केलेले काम आणि आम्ही केलेले दहा वर्षातील काम यातील फरक लोकांसमोर मांडतोय,  यामुळे प्रत्येकाला विनंती करतोय कि आमचे स्थानिक उमेदवार चांगले काम करत आहेत, त्यांना परत एकदा निवडून द्यावे.

सुनील कांबळे म्हणाले, मागील पाच वर्षात अनेक महत्वपूर्ण कामे मार्गी लागली आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मरकाचा प्रश्न मला मार्गी लावता आला याचा आनंद आहे, हे स्मारक लवकरच पूर्ण होईल असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0